‘नदीजोड प्रकल्पाद्वारे मराठवाडा आणि दुष्काळी भागात पाणी नेण्याच्या प्रस्तावाला जागतिक बँकेची मंजुरी’

टीम महाराष्ट्र देशा : कृष्णा खोऱ्यातलं अतिरिक्त पाणी नदीजोड प्रकल्पाद्वारे मराठवाडा आणि दुष्काळी भागात नेण्याच्या प्रस्तावाला जागतिक बँकेने मंजुरी दिली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. भारतीय जनता पक्षाची महाजनादेश यात्रा काल सांगली जिल्ह्यात दाखल झाली. पलूस इथल्या सभेत बोलतांना मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. तसेच सांगली जिल्ह्यातले युवा नेते सत्यजित देशमुख यांनी काल भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

दरम्यान, इस्लामपूर-ताकारी रस्त्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महाजनादेश यात्रेत मुख्यमंत्र्यांच्या गाडीसमोर कडकनाथ कोंबड्या फेकल्या. कडकनाथ कोंबडी घोटाळ्याची चौकशी करून संबंधितावर कारवाई करावी या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं. सांगलीहून निघून मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा काल कोल्हापूर इथं पोहोचली. यावेळी झालेल्या जाहीर सभेत त्यांनी, गेल्या पाच वर्षात राज्यात केलेल्या कामगिरीच्या आधारे जनतेनं मूल्यमापन करावं आणि पुन्हा एकदा भाजप महायुती सरकारला विजयी करावं, असं आवाहन केलं.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

आणि... अजित दादांमुळे मुख्यमंत्र्यांवर ओढविणारी नामुष्की टळली
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
महाविकास आघाडीचे 'जनक देवेंद्र फडणवीस' आहेत : शिवाजीराव आढळराव पाटील
...अन्यथा इंदोरीकरांच्या तोंडाला काळं फासू; असा इशारा देणाऱ्या तृप्ती देसाईंवर मनसेच्या रणरागिणीचा प्रतिइशारा
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
'...यासाठी राज ठाकरेंची दहशत हवीच'
बालेकिल्ल्यात भाजपला धक्का; मेहतांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादी-सेनेची माफी मागत भाजप सोडली
'बोकड बांधा लागते, मसाले आणा लागते, गावात तेव्हा लोक 'मतदान' करतात' : बच्चू कडू
इंदुरीकर-देसाई वादात आता 'भोर' महाराजांची ऊडी ; देसाईंना कापून टाकण्याची धमकी