हुकूमशाह किम जोंग यांनी पुन्हा दिले क्रूरतेचं दर्शन, जनरलला पिराना माशांच्या तलावात फेकलं

टीम महाराष्ट्र देशा : उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग ऊन यांनी पुन्हा एकदा आपल्या क्रूर प्रवृत्तीच दर्शन दिल आहे. किम जोंग ऊन यांनी जनरलना अतिशय क्रूर पद्धतीने पिराना माशांच्या तलावात फेकले आहे. नरल हे जोंग यांच्याविरोधात कटकारस्थान रचत असल्याचं त्यांना संशय होता. त्यामुळे जोंग यांनी शिक्षा म्हणून जनरलना पिराना माशांच्या तलावात फेकले आहे.

Loading...

किमने प्योंगयोंगमधील आपल्या रॉन्गसॉन्ग या निवासस्थाळी एक मोठा तलाव बनवला आहे. या तलावात माणसांना आपल्या दातांनी जिवंत फाडून खाणाऱ्या पिराना माशांना पाळलं आहे. जनरल आपल्याविरोधात षडयंत्र रचत असल्याचा संशय आल्याचं लक्षात येताच, किमने त्याचे हात आणि धड वेगळं केलं आणि पिराना माशांच्या तलावात फेकलं.

याआधी किम जोंग ऊन यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबती बातचीत निष्फळ ठरल्याने किमने आपल्या अमेरिकन राजदूताला मृत्यूदंड दिला होता. किमने त्याच्या एका मंत्र्यालाही तोफेच्या तोंडी दिलं होतं. मात्र अधिकाऱ्यांना मृत्यूदंड देण्याबाबतच्या बातम्या काही वेळा खोट्याही ठरल्या आहेत.

 Loading…


Loading…

Loading...