‘संभाजी भिडे यांना शह देण्यासाठीचं गोपीचंद पडळकरांना वंचितमध्ये आणले’

sambhaji bhide

टीम महाराष्ट्र देशा : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांना शह देण्यासाठीचं प्रकाश आंबेडकर यांनी गोपीचंद पडळकर यांना वंचितमध्ये आणले होते, असा दावा वंचित बहुजन आघाडीच्या पार्लमेंटरी बोर्डाचे सदस्य अण्णासाहेब पाटील यांनी केला आहे. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने औरंगाबाद जिल्ह्यातील ९ मतदारसंघासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू आहेत. यावेळी ते बोलत होते. याबाबतचे वृत्त दै. सकाळने प्रसिद्ध केले आहे.

यावेळी पाटील म्हणाले की, गोपीचंद पडळकर यांना ‘वंचित’मध्ये आणण्याची बाळासाहेबांची भूमिका ही खूप विचारपूर्वक होती. बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीचा संभाजी भिडेंना विरोध होता. संभाजी भिडे हे शत्रू आहेत. त्यामुळे शत्रूची ताकद कमी करण्यासाठी त्याच्या मागची फोर्स काढून घेण्यासाठीची ही नीती होती.

तसेच गोपीचंद पडळकर यांच्यासारखे अनेक तरुण संभाजी भिडेंची ताकत होते. शिवाय त्यांच्या जिवावरच संभाजी भिडे यांचा वावर वाढला होता. त्यामुळे वंचितला प्रभावी उमेदवारही मिळाला आणि भिडेंची ताकदही कमी झाली आहे, असे पाटील म्हणाले.