सरकारच्या प्रतिमात्मक पुतळ्यास शेणा-मुताने अंघोळ घालण्याची वेळ शेतकऱ्यांवर का आली ?

रयत क्रांती

नांदेड – रयत क्रांती संघटनेचे नेते आ.सदाभाऊ खोत यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यात दूध दर वाढीच्या मागणीसाठी चाबूक फोडो आंदोलन होत आहे. रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मांजरम गावातील गाई-म्हशी गोडयातील शिवारात सरकारच्या प्रतिमात्मक पुतळ्यास शेणा मुताने अंघोळ घालून व चाबकाने पुतळ्यास मारून चाबूक फोडो आंदोलन करत सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी सरकारच्या कारभाराविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

लॉक डाऊनचा गैरफायदा घेत खाजगी दुध कंपन्या व सहकारी दूध संघांनी दूध दर विक्री प्रति लिटर १० ते १८ रुपयांनी पाडले आहेत. सध्या गायीच्या दुधाला दर २२ रुपये व म्हशीच्या दुधाला दर ३२ रुपये मिळतो.हा दर शेतकऱ्यांना परवडणारा नाही,कारण खलीचा दर किलो ३० रुपये ,पशु खाद्याचा दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. अश्या परिस्थिती हा दर शेतकऱ्यांना संकटात टाकणारा आहे. बिस्लरी पाण्याच्या दर २० रुपये आहे अन दुधाला प्रतिलीटर २२ रुपये हे पाण्याला दुधापेक्षा जास्त महत्त्व आल्या सारखे आहे.

सरकारने उस एफआरपी नुसार दुधाला किमान आधारभूत किंमत द्यावी. गाईच्या दुधाला किमान ३० प्रती लिटर व म्हैशीच्या दुधाला किमान ६० प्रति लिटर दर द्यावे या शेतीपूरक दूध व्यवसायाला संरक्षण द्यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी गणेश शिंदे,सुरेश महाराज,गणेश गायकवाड,हणमंत गायकवाड, गणेश डॉक्टर, जयराज शिंदे,गोविंद गायकवाड, राजेश दरेंगाव,विनायक गायकवाड, शरद शिंदे, विश्वनाथ शिंदे इत्यादी शेतकरी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या

IMP