साध्वीला गावबंदी करून तोंड काळे करणाऱ्या गावांचा भीम आर्मी करणार सन्मान

टीम महाराष्ट्र देशा – शहीद हेमंत करकरे यांचा अवमान करणाऱ्या मालेगाव बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी व साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांना लोकसभा निवडणुकीत गावबंदी करून तोंड काळे करणाऱ्या गावांचा महाराष्ट्र भीम आर्मीच्या वतीने पुरस्कार देऊन गौरव करणार असल्याची घोषणा आर्मीचे महाराष्ट्र प्रमुख अशोक कांबळे यांनी केली आहे. प्रज्ञासिंग यांना लोकसभेची उमेदवारी देऊन भाजपने देशातील शहीदांचा अवमान केला असल्याची टीका महाराष्ट्र भीम आर्मीने केली आहे.

भोपाळमधील देशप्रेमी जनता प्रचारासाठी फिरणाऱ्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचे तोडं काळे करावे, चप्पलाचा हार घालून गाढवावर फिरवणे अशा वेगळ्या प्रकारे सत्कार केल्याशिवाय राहणार नाही. अशा गावांना महाराष्ट्र भीम आर्मीच्यावतीने देशभक्त गाव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येईल असे कांबळे यांनी सांगितले आहे.

भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी शहीदांच्या नावाने देशभर मतांचा जोगवा मागत असतानाच त्यांचाच पक्ष शहीदांचा अवमान करणाऱ्या आणि एका आरोपीला लोकसभेचे तिकीट देऊन आपल्या देशभक्तीचे प्रमाण देत असल्याचा घणाघात कांबळे यांनी केला.Loading…
Loading...