fbpx

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर बार्शीत काढली ३०० फुट लांब तिरंग्याची पदयात्रा

टीम महाराष्ट्र देशा : उद्या भारताचा ७३ वा स्वतंत्रदिन साजरा होत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यासह देशात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अशातच बार्शी शहरात एका अनोख्या पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्यावतीने या यात्रेचे आयोजन केले आहे.

बार्शी येथे दिनांक १४ ऑगस्ट २०१९ रोजी म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या एक दिवस आधी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्यावतीने तिरंगा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेतील तिरंगा हा ३०० फूट असणार आहे. या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे अशा प्रकारची पदयात्रा महाराष्ट्रात पहिल्यांदाच निघत असून त्यामुळे या यात्रेचे कौतुक होत आहे

या यात्रेत सुमारे २००० ते ३००० विद्यार्थी व समाजसेवक भाग घेणार असून बार्शी शहरातील मुख्य रस्त्यांवरून ही यात्रा निघेल. यासाठी बार्शी अभाविपचे पदाधिकारी तसेच सर्व सदस्य कष्ट घेत असून जास्तीत जास्त लोकांनी या यात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन अभाविप च्या वतीने करण्यात आले आहे.

दरम्यान, स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने दिल्लीतील एका कार्यक्रमात विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना वीर चक्र या सन्मानाने गौरवीत करण्यात येणार आहे. पाकिस्तानविरोधात निकराचा लढा देत दाखवलेल्या साहसाबद्दल त्यांचा गौरव करण्यात येणार आहे.