बागडेच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधी दिनाला भाजप कार्यकर्त्यांचा खोडा

blank

औरंगाबाद : कोल्हापूर सांगली,सातारा या जिल्ह्यात आलेल्या महापुरामूळे 17 ऑगस्टला विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या वाढदिवसाचे कोणीही बॅनर लावू नयेत, हा पैसा पुरग्रस्तांनासाठी देण्यात यावा. वाढदिवसाचा हा दिवस मुख्यमंत्री सहाय्यता निधी दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय बागडे समर्थकांनी घेतला आहे. या आशयाचे पत्रही काढण्यात आले. असे असताना याच कार्यकर्त्यांतर्फे ठिक-ठिकाणी शुभेच्छेचा बॅनर लूावन वाढदिवसाची भव्यता वाढवली जात आहे. स्वत: आवाहन करून तेच नियम भाजप आणि बागडे समर्थकच तोडत असल्याने हा दिन साजरा करावा कि वाढदिवस असाच प्रश्नचिन्ह भाजपच्या इतर कार्यकर्त्यांत उपस्थित होत आहे.

महिनाभरापासून हरिभाऊ बागडे यांच्या वयामूळे त्यांना आगामी विधानसभा निवडणूकीत तिकिट मिळणार नसल्याची जोरदार चर्चा केली जात आहे. त्यांचे वय 75 असल्यानेच त्यांना तिकिट मिळणार नसल्याची चर्चा केली जात आहे. यामूळे गेल्या आठवड्याभरपासून विधानसभा अध्यक्षांनी फुलंब्री मतदारसंघातील गावा-गावात जाऊन पाच वर्षांत केलेल्या कामाची गावकऱ्यांशी भेटून विचारपूस करीत आहेत. यातून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आपण इच्छुक असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न होत असल्याचीही चर्चा जोर धरु लागली आहेत.

बागडे यांच्या वयाचे राजकारण तापू लागले आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून 2014 मध्ये निवडणुक लढवलेल्या आणि हरिभाऊ बागडे यांच्या विजयासाठी कारणीभूत ठरलेल्या अनुराधा चव्हाण या भाजप मध्ये दाखल झाल्या. हरिभाऊ बागडे यांना तिकिट नाकारल्यास त्यांच्या ऐवजी अनुराधा चव्हाण, प्रदीप पाटील यांना तिकिट मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र विद्यामान मतदारसंघातून निवडूण आलेले हरिभाऊ बागडे हे सहजा-सहजी माघार घेणार नाही. त्यांच्यातर्फे वाढदिवसाच्या माध्यमातून जनशक्ती उभी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे विश्वासनीय सूत्रांनी सांगितले.

बागडेसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व संचालक मंडळ कामाला लागले आहेत. त्यांनीच पत्रक काढून हरिभाऊ बागडे यांचा वाढदिवस हा मुख्यमंत्री सहाय्यता निधी दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. वाढदिवसा निमित्त बॅनर लावू नका. तो पैसा मुख्यमंत्री सहाय्यता निधीत टाका असे त्या पत्रकात म्हटले आहेत. तर दुसरीकडे औरंगाबाद-जळगाव रोडवरील सावंगी, तसेच हर्सुल टी पॉईटस शहर’ करमाड व इतर ठिकाणी याच बागडे समर्थक असलेले बाजार समिती संचालक मंडळानी हरिभाऊ बागडे यांच्या वाढदिवसाची शुभेच्छेचे मोठे बॅनर लावले आहेत. म्हणजे एकीकडे मदतीचे आवाहन करणारे हेच समर्थ दुसरीकडे बागडेसह स्वत:चे मोठे फोटो लावून वाढदिवसाची भव्यता वाढवताना दिसून येत आहेत.