कत्तल करण्यासाठी चालवलेल्या गायींची सुटका

नेवासा – राज्यात गोवंश कत्तलीवर बंदी असतानाही अनेक ठिकाणी चोरट्या मार्गाने गायीच्या कत्तली होत असल्याचं दिसून येत आहे. अहमदनगर जिह्यातील नेवासा बुद्रुक परिसरात नेवासा श्रीरामपूर राजमार्गावर एस कॉर्नर येथे सापळा लावून पोलिसांनी बेकायदेशीरपणे कत्तलीसाठी गायी आणि बैलांची तस्करी करणारे वाहन पकडली आहेत.

या वाहनामध्ये ५ गाई, २ बैल अशी ७ जनावरे होती. सदरची जनावरे पोलिसांनी उतरून घेतली व नेवासा पशु वैद्यकीय अधिकारी यांना बोलावून सदरच्या जनावरांची पाहणी व तपासणी केली. वाहनासह ७ जनावरे असा २ लाख १८ हजार रुपयांचा माल ताब्यात घेतला. वाहन चालक फिरोज अन्सार देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महाजन हे करीत आहेत.