खा. सुप्रिया सुळे यांनी केली सरकारची पोलखोल !

यवतमाळ : सरकारची खोटी आश्वासने आणि फसव्या योजनांचे वास्तव यवतमाळच्या मडकोना गावात समोर आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी खोटया आश्वासनामुळे जीणं मुश्किल झालेल्या शेतकऱ्याची घरी भेट दिली. त्यावेळी धक्कादायक वास्तव समोर आले.

यवतमाळ तालुक्यातील मडकोना गावातील जीवनराव बाबाराव माकडे या शेतकऱ्याने ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेखाली सरकारकडे शेततळे, विहीर आणि दीड लाखाची कर्जमाफी मिळावी म्हणूनही सरकारकडे मागणी केली. मात्र, सरकारने ना शेततळे दिले ना विहीर दिली, ना कर्जमाफी केली. फक्त आश्वासनापलीकडे या सरकारने काहीच दिले नाही हे गंभीर वास्तव जीवनराव माकडे शेतकऱ्याने खासदार सुप्रिया सुळे यांच्यासमोर मांडले.

कर्जमाफी न मिळालेल्या शेतकरी जीवनराव माकडे यांची पत्नी लता माकडे यांना ही व्यथा सांगताना रडूच आवरत नव्हते. लता माकडे यांनी जे वास्तव सांगितले त्याने सुप्रिया सुळेही भावूक झाल्या. कर्जबाजारी असल्यामुळे मुलांचे शिक्षण होईना. कसे फेडावे कर्ज हेच कळेना अशा भावना त्या महिलेने सुप्रिया सुळे यांच्याकडे मांडल्या. सुप्रिया सुळे यांनी त्या महिलेचे सांत्वन करताना मी आणि माझा पक्ष तुम्हाला न्याय मिळवून देऊ.

मी स्वत: यामध्ये लक्ष घालून जिल्हाधिका-यांना सांगते असे आश्वासन सुप्रिया सुळे यांनी त्या शेतकरी कुटुंबाला दिले. आज पद यात्रेचा दुसरा दिवस असून मडकोना गावातून याची सुरुवात झाली. याचवेळी जीवनराव माकडे या शेतकऱ्याची खासदार सुळे आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भेट घेतली. आणि त्यावेळी हे वास्तव समोर आले आणि सरकार किती खोटे बोलत आहे हे सुळे यांनी हल्लाबोल पदयात्रेतून समोर आणले आहे.

Comments
Loading...