भाजपच्या उमेदवारांचा प्रचार करणार नाही- महादेव जानकर

टीम महाराष्ट्र देशा ;- विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेची युती झाली. परंतु काही काळ जागावाटपारून दोन्ही पक्षात काही तडजोड होत नव्हती. परंतु,अखेर जागा वाटप झाली आणि शिवसेनेला १२४ तर भाजपने १६४ जागा घेतल्या. त्यापैकी १४ जागा मित्रपक्षांना सोडल्या खऱ्या. पण, यातही काही जागांवर मित्रपक्षांना भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यास सांगण्यात आले. त्यानंतर राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर नाराज झाले. त्यानंतर आता त्यांनी भाजपच्या उमेदवारांचा प्रचार करणार नसल्याचे म्हटले आहे.त्यांनी आज नाशिक मध्ये पत्रकार परीषेत घेतली त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी पुढे बोलताना जानकर म्हणाले, महायुतीच्या जागावाटपामध्ये मित्रपक्षांना भाजपच्या जागांवर लढण्यास सांगण्यात आले. पण, त्यात रासपच्या दोन उमेदवारांना त्यांच्या चिन्हावर लढण्यास भाजप तयार झाली. त्यानंतर आता रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी रासपचे जे दोन उमेदवार भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत, त्यांचा प्रचार करणार नसल्याचे म्हटले आहे.

तसेच रासप आणि भाजप यांच्यातली भांडणं ही घरातले आहे. इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती असल्याने महायुतीत आहे. रासप सोडून भाजपच्या चिन्हावर उभे राहणाऱ्या महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचाराला जाणार नाही. महायुतीमध्ये भाजप सर्वात ताकतवान असल्याने तो सर्वांचा मोठा भाऊ आहे आम्हाला एक जागा दिली तरी आम्ही समाधानी आहोत.असे जानकरांनी सांगितले आहे.

दरम्यान, महायुतीकडून दौंड व जिंतूर मतदारसंघ राष्ट्रीय समाज पक्षासाठी सोडण्यात आले होते . परंतु या मतदारसंघातील उमेदवारांना भाजपचे एबी फॉर्म दिले गेले आणि  कमळ चिन्हावर लढण्याचा आदेश दिण्यात आले होते  . भाजप श्रेष्ठींच्या आदेशानुसार दौंड मतदारसंघाचे उमेदवार राहुल कुल यांनी कमळ चिन्हावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. तर जिंतूर मतदारसंघाच्या उमेदवार मेघना बोर्डीकर यांनीही कमळ चिन्ह स्वीकारले आहे. त्यामुळे महादेव जानकर यांनी या उमेदवाराचा प्रचार करणार नसल्याचे म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या