विद्यार्थिनींशी अश्लिल चाळे करणाऱ्या संस्थापकाला अटक

mit crime

पुणे , २९ जानेवारी, (हिं.स.) : शाळेतील विद्यार्थिनींना बाथरूममध्ये बोलावून संस्थापक आणि शिक्षकांकडून विद्यार्थिनीसोबत अश्लील चाळे केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. जुन्नर येथील येनेरे इंडियन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ही घटना घडली. शाळेचे संस्थापक सचिन घोगरेसह दोन शिक्षकांवर जुन्नर पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.सूत्रानुसार, आदिवासी विकास विभागांतर्गत जव्हार प्रकल्पातील 250 विद्यार्थी जुन्नर तालुक्यातील येनेरे इंडियन इंग्लिश मीडियम शिकतात.

Loading...

स्कूलमधील आदिवासी विद्यार्थिनींना बाथरूममध्ये बोलावून त्यांच्याबरोबर छेडछाड करून त्याच्यासोबत अश्लील चाळे करत शिक्षकांनी पेशाला काळिमा फासला आहे. त्यामुळे आदिवासी अस्मिता संघटना पालघर यांनी पुढाकार घेऊन आदिवासी विद्यार्थिनींना न्याय मिळण्यासाठी पालकांना हाताशी घेऊन त्या संचालकासह दोन शिक्षकांवर जुन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तसेच पोलिसांनी त्या आरोपींला अटकही केली आहे. त्यामुळे जव्हार प्रकल्पातील विद्यार्थी-पालकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.Loading…


Loading…

Loading...