कृषी विभाग माहिती देत नसल्यामुळे संभाजी ब्रिगेडचे उपोषण

अभिजित कटके

सोलापूर –  : कृषी कार्यालयातील चारही मंडल अधिकारी व तालुकाधिकारी यांनी केलेल्या कामाचा निषेध करण्यासाठी आणि चार वर्षे उलटली तरी माहिती देत नसल्यामुळे संभाजी ब्रिगेडने कृषी कार्यालयासमोर उपोषण केले. या वेळी उपहासात्मक पुरस्कारांचे वितरणही केले. माहिती देण्याच्या अटीवर उपोषण माघारी घेण्यात आले. राज्य माहिती आयुक्तांनी आदेश देऊनही तांत्रिक कारण देत माहिती देण्यास टाळाटाळ करून करमाळा कृषी कार्यालयाने आदेशाला केराची टोपली दाखवली.

त्यामुळे संभाजी ब्रिगेडने तालुका कृषी कार्यालयासमोर प्रजासत्ताकदिनी अांदोलन करून निषेधाचे पुरस्कार जाहीर केले होते. मागणी केलेल्या विषयाची माहिती ६ फेब्रुवारी २०१८ रोजी देण्याचे लेखी अाश्वासन दिले. त्यामुळे संभाजी ब्रिगेडने आंदोलन तात्पुरते स्थगित केले. शासन मोठ्या ऐटीत विकासाच्या गप्पा मारत आहे. पण केलेल्या विकासकामांबाबत माहिती मागितली तर चार ते पाच वर्षे लागत आहेत म्हणून विकास वेडा झाला आहे, या पुरस्काराचे वितरण अधिकाऱ्यांना केले.

विशेष म्हणजे त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमा आहेत. हे पुरस्कार न स्वीकारल्याने कार्यालयात ठेवण्यात आले. करमाळा कृषी कार्यालयासमोर उपोषणाला बसलेले संभाजी ब्रिगेडचे सचिन जगताप, नितीन खटके, अमित घोगरे व कार्यकर्ते याना संबंधित विभागाच्या वतीने आश्वासन मिळाले,

4 Comments

Click here to post a comment