तुकाराम मुंढेंचा गोंधळी ‘व्हिडीओ व्हायरल’

तुकाराम मुंढे

पुणे : परिवहन महामंडळाचे (पीएमपी) अध्यक्ष तुकाराम मुंढे यांची हेकेखोर, हुकुमी, आक्रस्ताळी आरडाओरड एका चित्रफितीमधून समोर आले आहे. स्वारगेटच्या कार्यालयाबाहेर जमलेल्या कर्मचाऱ्यांना मुंढे यांनी अपमानास्पद वागणूक दिल्याचे या व्हिडिओतून दिसत आहे.

पीएमपीने कर्मचारी भरती संदर्भात यादी प्रसिद्ध केल्याची चर्चा आहे. पण, या यादीत पूर्वीपासून प्रशिक्षणार्थी म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना डावलण्यात आले आहे. त्यामुळे हे कर्मचारी पीएमपीच्या स्वारगेट येथील कार्यालयाबाहेर जमले होते.

त्यावेळी तिथे येऊन मुंढे यांनी या कामगारांना अत्यंत अपमानस्पद वागणूक दिली. या प्रकरणी आम्ही मुंढे यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.