महायुतीतील चार मित्रपक्षांची उद्या बैठक – रामदास आठवले

athawale-ramdas-

मुंबई – भाजप शिवसेना महायुतीतील मित्र पक्ष असलेल्या रिपब्लिकन पक्ष, रासप, शिवसंग्राम आणि रयत क्रांती संघटना या चार मित्र पक्षांची महत्वपूर्ण बैठक उद्या गुरुवार दि 31 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता सुरुची इमारत 9 वा माळा येथे आयोजित केली आहे .

या बैठकीत चार ही मित्रपक्षांचा सरकार मधील सहभाग आणि सत्ता वाटप बाबत या बैठकीत महत्वपूर्ण चर्चा करण्यात येणार आहे. या बैठकीत रिपाइं चे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले, रासप प्रमुख महादेव जानकर, रयत क्रांती चे प्रमुख सदाभाऊ खोत, शिवसंग्राम चे प्रमुख आ.विनायक मेटे हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

रिपाइंचे सरचिटणीस राज्यमंत्री अविनाश महातेकर यांच्या सुरुची येथील 9 व्या मजल्यावरील निवासस्थानी ही बैठक होणार आहे.

दरम्यान आज दुपारी भाजप चे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांची रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांनी भेट घेऊन चर्चा केली.उद्या मित्रपक्ष आपली सरकारमधील सत्तवाटप बाबत मोर्चे बांधणी करणार आहेत.

महत्वाच्या बातम्या