हिंदी नव्हे तर मराठी ‘झिंगाट’लाच प्रेक्षकांची पसंती

टीम महाराष्ट्र देशा- मराठी सुपरहिट सिनेमा ‘सैराट’चा हिंदी रिमेक ”धडक” मधील ”झिंग झिंग झिंगाट” गाणं नुकतंच प्रेक्षकांच्या  भेटीला आलं. अजय-अतुल यांचे  संगीत,अमिताभ भट्टाचार्य यांच्या लिरिक्स,अजय गोगावले आणि श्रेया घोषाल यांचा आवाजामुळे त्याने जरी  प्रेक्षकांमध्ये पसंती असली तरी, पण कळत-नकळत पणे त्याची तुलना होते ते मराठी गाण्यासोबत. मराठी झिंगाट मध्ये जो बिंदासपणा आहे तो कुठे तरी मिसिंग असल्याचं  यातून जाणवते.

मराठी झिंगाटने जी मोहिनी प्रेक्षकांवर घातली आहे त्याची तुलना या काय कोणत्याच गाण्यासोबत होऊच शकत नाही. अगदी लहानापासून ते वयोवृद्धांपर्यंत  असं कोणीही  नसेल कि त्याने या गाण्यावर एकदा हि डान्स केला नसेल.  झिंगाट गाणं येऊन इतकी वर्ष झाली पण अजून ते लोकांच्या हिट लीस्टमध्ये आहे. मराठी प्रेक्षकांनी हिंदी झिंगाट बद्दल  नाराजी व्यक्त करत आहे  विशेषतः सोशल मीडियावर या गाण्याला ट्रोल केलं जात आहे.

गाण्यातील संगीत जरी सारखं  असेल आणि दृश्य जरी बदलेलं असलं  तरी मराठी गाण्याची आठवण आल्याशिवाय राहत नाही. ओरिजिनल गाण्याचा डान्स त्यात आर्ची आणि परश्या ची केमिस्ट्री,सल्या आणि लंगड्याची  मैत्री, यामुळे त्या गाण्यात असणारी मजा खरोखरच वेगळी होती. धडक मधील झिंगाट आलं आहे खरं पण ते प्रेक्षकांच्या पसंतीस कितपत  उतरत याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागून आहे.

पद्मावती वर सेन्सॉर बोर्डाच्या निर्णयाला राजघराण्यातील सदस्यांचा विरोध

‘धडक’चा ट्रेलर प्रदर्शित झाला तेव्हापासूनच त्याची तुलना ‘सैराट’शी होऊ लागली. त्यामुळे झिंगाट या गाण्याचीही तुलना होणे साहजिक होते. मात्र रिमेकच्या नादात गाण्याचं फक्त हिंदीकरण झाल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. हे नवीन व्हर्जन प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात अयशस्वी ठरलय हे यावरून स्पष्ट होत आहे.

You might also like
Comments
Loading...