fbpx

जिल्हा परिषदेच्या शाळांचे कार्य कौतुकास्पद – विठ्ठलराव लंघे

नेवासा/भागवत दाभाडे: पूर्वी समाज्याचा जिल्हा परिषद शाळांकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा होता. गेल्या तीन-चार वर्षापासून जिल्हा परिषद प्राथमिक शाळांचे काम चांगल्या प्रकारे सुरु असून नवीन शिक्षक व शिक्षिका चांगले काम करीत असून शाळेेचा दर्जा सुधरण्यासाठी मेहनत घेत आहे. ग्रामिण भागातील गोर-गरीबांची मुले या शाळेत शिक्षण घेत असल्याने जिल्हा परिषद व महाराष्ट्र शासन चांगले उपक्रम राबवित असून शिरसगाव केंद्रा अंतर्गत येणार्या बारा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे कार्य कौतुकास्पद असल्याचे गौरउदगार जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांनी काढले.

शिरसगाव केंद्र स्तरावरील सांस्कतिक व विविध कलागुण स्पर्धेचा कार्यक्रम शिरसगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मध्ये पार पडला यावेळी अध्यक्ष स्थानावरून लंघे बोलत होते. यावेळी व्यसपीठावर पंचायत समितीच्या सदस्या सुषमा संजय खरे, केंद्र प्रमुख गोपिनाथ पवार,शाळा व्यवस्थापन समिती चे उपाध्यक्ष बद्रिनाथ देशमुख, सुनिल गवारे,कैलास आहेर, जर्नाधन लंघे,अविनाश लंघे,प्रशांत लंघे,प्रविण घुले आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना लंघे म्हणाले,ग्रामिण भागातील मुले स्पर्धेच्या युगात मागे राहू नये म्हणून जिल्हा परिषद लक्ष केंद्रित करून शिक्षणावर जास्तीत जास्त खर्च करत आहे. माझ्या अध्यक्ष काळात मुलांना बसण्यासाठी मी बेंच उपलब्ध करून दिल्या होत्या. कमी पट संख्येच्या शाळा बंद करण्यात आल्या आहेत हा निर्णय विद्यार्थी व पालकांसाठी त्रास दायक असल्याचे लंघे म्हणाले. यावेळी त्यांनी शिक्षक व शिक्षिका यांचे कौतुक केले.
यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी आपल्या कला गुणांचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले व उपस्थीतांचे मने जिंकली. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शिरसगाव केंद्र शाळा अंतर्गत येणार्या बारा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या सर्व मुख्याधापक, शिक्षक व शिक्षिका यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक जालिंदर गोरे यांनी केले, सुत्रसंचालन विठ्ठल काळे यांनी केले तर आभार शिक्षक रामेश्वर शिंदे यांनी मानले.

1 Comment

Click here to post a comment