कॅन्टीनमध्ये जाऊन शिवभोजन थाळीचे उद्घाटन करण्यासाठी पालकमंत्र्यांकडे नव्हता वेळ?

भंडारा – निवडणुकीच्या काळात शिवसेनेने त्यांच्या घोषणापत्रात गरीब लोकांना केवळ 10 रुपयात जेवण देऊ अशी घोषणा केली होती. त्यानंतर महाविकास आघाडीची स्थापना झाली आणि शिवसेनेने केलेल्या घोषणेला अस्तित्वात आणण्यासाठी शिवभोजन थाळी 26 जानेवारी पासून संपूर्ण महाराष्ट्रात सुरू करण्याची योजना ठरली.

ग्रामीण भागातील लोकांसाठी कमी पैशात जेवण उपलब्ध व्हावे. यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने ‘शिवभोजन थाळी’ योजनेचा 26 जानेवारी पासून संपूर्ण राज्यात शुभारंभ करण्यात आला. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून अनेक ठिकाणी स्वतः उपस्थित राहत या उपक्रमाचे उद्घाटन केले मात्र भंडाऱ्यात काहीसे वेगळे चित्र पाहायला मिळाले.

Loading...

भंडारा जिल्ह्यात दोन ठिकाणी योजनेची सुरुवात करण्यात आली. या उपक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री विश्वजित कदम हे करणार होते. मात्र, त्यांनी ध्वजारोहण कार्यक्रमानंतर तिथे केवळ शिवभोजन थाळी या फलकाचे उद्घाटन केले. ज्या ठिकाणी योजना सुरू करण्यात आली. त्या ठिकाणी जाऊन पाहण्याचे साधे औचित्य पालकमंत्र्यांनी दाखविले नाही.etv bharatने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

भंडारामध्ये सुरुवातीला महसूल कॅन्टीन आणि जिल्हा परिषदमधील कॅन्टीनमध्ये ही योजना राबविली जाणार आहे. 26 तारखेला पालकमंत्र्यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन होणार असल्याची घोषणा करण्यात आली. मात्र, पालकमंत्र्यांनी औपचारिकता पूर्ण करत ध्वजारोहणाच्या स्थळी केवळ फलकाचे उद्घाटन करून ते मोकळे झाले. त्यामुळे पालकमंत्र्यांना या शिवभोजन थाळीचे किती महत्त्व आहे, असा प्रश्न निर्माण होत आहे.

तर दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारच्या महत्त्वाकांक्षी शिवभोजन योजनेचं प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुण्यात उद्घाटन करण्यात आले. अजिप पवार यांनी पुण्यामध्ये आणि आदित्य ठाकरे यांनी मुंबईत या योजनेचे उद्घाटन केले.मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते आज मुंबई सेंट्रल येथील नायर धर्मादाय रुग्णालय कँन्टिनमध्ये करण्यात आले. यावेळी पालकमंत्र्यांनी लाभार्थ्यांना शिव भोजन थाळी देऊन योजनेची सुरुवात केली.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
दणका राज ठाकरेंचा ! औरंगाबादमध्ये 'मनसे गद्दाराची' केली 'हकालपट्टी'
गोपीनाथ मुंडेंच्या आग्रहाला 'बळी' पडलो; मोदींवर विश्वास ठेवला, मात्र घडलं 'भलतंच'
जयंत पाटील आणि मी अडचणीतले 'प्रदेशाध्यक्ष' : बाळासाहेब थोरात