स्व.वकिलराव लंघेंचे कार्य समाजाला दिशा देणारे:विठ्ठलराव लंघे

भागवत दाभाडे/नेवासा: दहा वर्षे शेवगाव-नेवासा मतदार संघाचे आमदार राहिलेले स्व.वकिलराव लंघे(आण्णा)हे रोजगार हमी योजने चे जनक म्हणून ओळखले जातात. त्यांनी आपल्या काळामध्ये अनेक गोर-गरीबांना मदत केली आहे. शेतकरी हिताच्या द्रष्टीकोनातून कारखाना उभारणी,शाळा उभारण्यासाठी मदत केली आहे. ते सर्व सामन्याच्या गळ्यातील ताईत होते.त्यांच्या तत्वनिष्ठा स्वभावामुळे त्यांनी वसंतराव पाटीलांच्या मंत्रिमंडळात मंत्री पद नाकरले होते. राज्यभर आण्णाचे नाव मोठ्या अदराने घेतले जाते. त्यांचे काम समाज्याला दिशा देणारे होते.आपण त्यांच्या संस्कारातून समाजासाठी काम करत असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांनी केले.

Loading...

स्व.वकिलराव लंघे यांच्या २२ व्या पुण्यतिथी चा कार्यक्रम वकिलराव लंघे पाटील विद्यालयात आयोजित करण्यात आला होता यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बबनराव देशमुख होते.प्रस्ताविक प्राचार्य जनार्धन भागवत यांनी केले. यावेळी सुनिल वाघमारे, महेश देशमुख, मुरलीधर देशमुख आदीनी आपल्या भाषणातून स्व. वकिलराव लंघे(आण्णा) च्या आठवणीला उजळा दिला.

स्व.वकिलराव लंघे यांची २२ वी पुण्यतिथी शिरसगाव येथे वकिलराव लंघे माध्यमिक विद्यालय, मातोश्री सुनोचना वकिलराव लंघे पब्लिक स्कूल,स्व.वकिलराव लंघे सार्वजनिक वाचनालय या ठिकाणी साजरी करण्यात आली. पुण्यतिथी निमित्त विद्यालयात रांगोळी,चित्रकला,वक्तृत्व, सामन्यज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मुलांनी स्वःता बनवलेल्या पदार्थाचे स्टाँल लावले होते. उपस्थित मान्यवरांनी या पदार्थांची खरेदी करून आस्वाद घेतला.

कार्यक्रमास संजय खरे,गणेश लंघे,सरपंच संजय लंघे,दत्तात्रय पोटे,सुनिलराव लंघे,संतोष सोमुसे,नितीन देशमुख, कडूबाळ गोरे,दिपक आगळे, प्रविण लंघे, रामेश्वर देशमुख,प्रा.गणेश देशमुख, आविनाश लंघे,रामेश्वर देशमुख, भाऊसाहेब पोटे,शिक्षक एम.के.देशमुख,बाबासाहेब धनवटे,दत्तात्रय जरे, जयसिंग खंडागळे, सचिन दसपुतें ,वीर आदी उपस्थित होते.Loading…


Loading…

Loading...