काकांशी गद्दारी करणाऱ्यांची छत्रपतींबद्दल बोलण्याची लायकी नाही

blank

टीम महाराष्ट्र देशा : २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत सातारा येथून उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर विजय मिळवला होता. परंतु विधानसभा निवडणुकीपूर्वी उदयनराजे भोसले यांनी खासदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या प्रवेशावरून अनेक राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली आहे.

राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी उदयनराजेंवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी सोळाव्या शतकांत अनाजीपंतानी छत्रपती शिवाजी महाराजांच्या घरात फुट पाडली आणि एकाविसाव्या शतकातले आजचे महाराज अणाजीपंताना शरण गेले, काय सांगणार आम्ही पुढच्या पिढ्यांना इतिहास अशी बोचरी टीका केली होती.

त्यांच्या या टीकेला छत्रपती उदयनराजे भोसले सेना प्रतिष्ठान बीड जिल्हाच्या वतीने एक पत्रक काढून धनंजय मुंडे यांना दम देत “आपल्या काकांशी गद्दारी करणाऱ्यांची छत्रपती उदयनराजेंबद्दल बोलण्याची गद्दाराची लायकी नाही” असं विधान केले आहे. तसेच त्यांच्यावर अनेक मुद्द्यांवरून हल्ला केला आहे.

या पत्रात पुढे बोलताना त्यांनी छत्रपतीचे वंशज आणि जनतेतून सतत निवडुण येणारे खा.छ.उदयनराजे भोसले यांच्या विरोधात टिका करणे विधिमंडळात मागच्या दाराने येऊन टिका करणारा डुप्लिकेट लोकांची लायकी आहे का ?.सिबासीस कॉलेजच्या काळात मुंडे साहेबांचा पुतण्या म्हणून चार लोकांत मिरवुण घेणारांची मैत्री हातभट्टी आणि खंडणीखोरासोबत असेल राजेंबरोबर नाही.

गोपीनाथ मुंडे आणि उदयनराजे भोसले याचे संबंध अत्यंत जिव्हाळ्याचे आहेत.त्यांनीच प्रथम राजेंना भाजपात घेत राज्यमंत्री पद उदयनराजेंनी भुषवले होते.तेंव्हा काकांच्या सोबत गद्दारी केल्यानंतर उदयनराजे भाऊ सदैव पंकजाताईची पाठराखण करत आले आहेत.त्यामुळे,आजही राजे बीडकरांच्या मनात घर करून आहेत.

काकांच्या डोक्यात धोंडा घालणारे गद्दार चमचे विनोदी पक्ष नेते कुठलाही जातीचे होऊ शकत नाहीत.छत्रपती अंनाजी पंताला शरण गेले या भंपक डाॅयलाग बाजी मधून तुम्ही मराठा तसेच ब्राम्हण समाजाबाबत असलेली मळमळ तुम्ही व्यक्त केली आहे.परळीच्या गद्दारानी स्वामीभक्तीपोटी कोणाचे पाय चाटायचे हा त्यांचा प्रश्न आहे.परंतु उदयनराजेंच्या विरोधात बोलण्यासाठी पात्रता येण्यासाठी दहा जन्म घ्यावे लागतील.तुमचा हिशोब चुकता करण्याकरता सर्व छत्रपतीचे मावळे आगामी परळी विधानसभा रणाची वाट पाहत आहोत.तेंव्हा तुम्ही रणछोडदास होऊन पोबारा करू नका ऐवढीच अपेक्षा!!

blank