fbpx

सामाजिक सलोखा आणि ऐक्यासाठी तिरंगा यात्रेचे आयोजन

नेवासा / भागवत दाभाडे : सामाजिक सलोखा आणि ऐक्यासाठी भारतीय जनता पार्टी नेवासा यांच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त, नेवासा ते श्री क्षेत्र देवगड मोटारसायकल रॅलीचे व तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. आमदार बाळासाहेव मुरकुटे यांनी त्यांच्या संपर्क कार्यालय नेवासा येथे ध्वजारोहन करून संविधान वाचन केले. व ज्ञानेश्वर मंदिर येथुन सुरू झालेल्या तिरंगा रॅली नेवासा शहर

नेवासाफाटा मार्गे देवगड येथे पोहचली व दर्शन घेऊन समारोप झाला. यावेळी रॅलीत आमदार बाळासाहेब मुरकुटे ,तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पेचे ,युवा मोर्चाचे तालुलाध्यक्ष सतीश कर्डीले , संघटक अशोक टेकने,सचिन सांगळे,भाऊ नगरे, निरंजन डहाळे, प्रताप चिंधे, शरद जाधव, अनंता डहाळे, दादा वाघ ,महेंद्र आगळे, महेंद्र मुळे ,सचिन नागपुरे, साहेबराव दाणे बापूसाहेब औटी , सुखदेव कदम संभाजी म्हसरूप, आदी व भारतीय जनता पार्टीचे , युवा मोर्चाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.