प्रियदर्शन जाधव घेवून येत आहे रॉमकॉन शैलीचा ‘मस्का’

टीम महाराष्ट्र देशा- कोणाचीही फसवणूक करायची सर्वात सोपा मार्ग म्हणजे त्या व्यक्तीचा विश्वास जिंकणे. हा विश्वास जिंकण्याचे साधन म्हणजे त्या व्यक्तीला मस्का लावणे .मस्का लावल्यानंतर एकदा का त्या व्यक्तीचा विश्वास जिंकला की मग त्या व्यक्तीला कधीही दगा देऊ शकतो. याच सूत्राचा वापर असलेला ‘मस्का’हा प्रियदर्शन जाधव दिग्दर्शित लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘मस्का’ या चित्रपटाचे कथा लेखन आणि दिग्दर्शन सुप्रसिद्ध अभिनेते प्रियदर्शन जाधव यांनी केले आहे. लेखक, अभिनेता, नाट्यदिग्दर्शक असलेले प्रियदर्शन जाधव या निमित्ताने चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण करणार आहेत.

Loading...

प्रियदर्शनने याआधी विविध नाटकांचे दिग्दर्शन केले आहे. त्यानंतर आता तो मस्का या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. खाण्यापेक्षा लावण्यात मजा आहे अशी या चित्रपटाची टॅगलाईन आहे. या चित्रपटाचे पहिले पोस्टर,टीझर आणि गाणी नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आली असून सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळत आहे.

‘मस्का’ हा चित्रपट रॉमकॉन शैलीचा आहे. आजवर सोज्ज्वळ भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे ‘मस्का’ नेक्स्ट डोअरच्या बोल्ड भूमिकेत दिसणार आहे. या कथेत स्त्री पात्राची भूमिका जबरदस्त, धमाल आणणार आहे. या शिवाय अभिनेते शशांक शेंडे, विद्याधर जोशी आणि प्रणव रावराणे हे कलाकार देखील या चित्रपटात आहे. ‘मस्का’ मध्ये वेगवेगळी नावे वापरून पुरुषांची फसवणूक करणारी एक स्त्री असल्याचे दिसते ती नेमकी कोण? याचा उलगडा या चित्रपटातून होणार आहे.

मस्का या चित्रपटाच्या पोस्टवरमध्ये एक प्लेट दिसत असून त्यामध्ये पैसे आणि त्यावर हार्ट शेपमधील ब्रेड आहे. या चित्रपटात चिन्मय मांडलेकर, अनिकेत विश्वासराव, प्रार्थना बेहरे, शशांक शेंडे, विद्याधर जोशी, प्रणव रावराणे यांच्या मुख्य भूमिका आहेत. मोरेश्वर प्रॉडक्शन्स निर्मित, अमोल जोशी प्रॉडक्शन्स आणि स्वरूप रिक्रिएशन्स अँड मिडिया प्रा. ली. प्रस्तुत ‘मस्का’ चे प्रशांत पुरुषोत्तम पाटील निर्माते आहेत, तर प्रस्तुतकर्ता सायली जोशी, सचिन नारकर, विकास पवार आणि सह प्रस्तुतकर्ता आकाश पेंढारकर आणि विनोद सातव आहेत.

मंगेश कांगणे यांच्या गीतांना संगीतकार चिनार – महेश यांनी स्वरसाज चढविला आहे. चित्रपटाचे छायांकन अमलेंदू चौधरी यांचे आहे आणि निलेश नवनाथ गावंड संकलक आहेत. अत्यंत हटके विषयावरील सस्पेन्स, थ्रीलर आणि कॉमेडी असा मनोरंजनाचा फुल टू मसाला असलेला ‘मस्का’ हा चित्रपट येत्या १ जून रोजी महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.Loading…


Loading…

Loading...