fbpx

टेंभुर्णी घटनेतील आरोपींना फाशी द्यावी; परिवर्तन समितीची मागणी

श्रीरामपूर/राजेश बोरुडे: टेंभुर्णी येथील बारावीत शिक्षण घेणाऱ्या युवतीची अत्याचार करून हत्या करणाऱ्या आरोपींना फाशी देण्याची मागणी परिवर्तन समितीने मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात केली आहे.
तिलक डुंगरवाल, अमोल सावंत , विकास डेंगळे, यशवंत जेठे आदींनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात नमूद केले आहे कि, लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यात असलेल्या टेंभुर्णी येथील बारावीत शिक्षण घेत असलेली कोमल पवार या युवतीचे अपहरण करून तिच्यावर पाशवी अत्त्याचार करून तिची निर्घृणपणे हत्त्या करण्यात आली.

सदर गुन्ह्यातील आरोपींना त्वरित अटक करून तो खटला जलदगती न्यायालयात चालवण्यात यावा.नराधमांना फाशी देणेकामी सर्व कागदपत्रांची योग्य काळजी घेऊन आरोपीविरुध्द चार्जशीट दाखल करावे.या प्रकरणात सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी. सदर प्रकरणात आजपर्यंत आरोपीना अटक का करण्यात आली नाही याची चौकशी करून यात हितसबंध असलेल्या अधिकाऱ्यांची सीआयडी चौकशी करण्यात यावी अशा विविध मागण्या परिवर्तन समितीच्या वतीने करण्यात आल्या आहे

2 Comments

Click here to post a comment