लोकशाहीतील घराणेशाही भाग एक : तटकरे कुटुंबीय

sunil tatkare family final

टीम महाराष्ट्र देशा- राजा हा राजाच्या पोटी नव्हे तर मतपेटीतून जन्माला यावा असे घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हटले आहे. मात्र गल्लीपासून दिल्लीपर्यंत घराणेशाहीच्या वाळवीने लोकशाहीला पोकळ केले असल्याचे चित्र आहे.देशातील सर्व पक्ष घराणेशाहीला आमचा विरोध असल्याचं दाखवतात मात्र मुंबईतील मातोश्री ते परळीतील यशश्रीपर्यंत आणि बारामती पासून नागपूर पर्यंत सगळीकडे घराणेशाही पहायला मिळते.

भारत हा लोकशाहीप्रधान देश आहे असं म्हटलं जात मात्र या लोकशाहीचा बुरखा पांघरून प्रस्थापित नेत्यांकडून कशा पद्धतीने घराणेशाही चालवली जाते हे आम्ही जनतेसमोर आणत आहोत. लोकशाहीतील घराणेशाही या आमच्या विशेष सदरात महाराष्ट्रातील विविध घराणी कशापद्धतीने सत्ता आपल्याच घरात रहावी यासाठी प्रयत्नशील असतात हे आपण जाणून घेणार आहोत. आज आपण कोकणात ज्याचं मोठ साम्राज्य आहे अश्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे आणि त्यांच्या कुटुंबियांविषयी जाणून घेणार आहोत.

Loading...

सुनील तटकरे –

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मातब्बर नेते असून महाराष्ट्र विधानपरिषद सदस्य (आमदार) आहेत. शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू सहकारी आहेत. आघाडीच्या सरकारच्या काळात राज्याचे अन्न व नागरीपुरवठा मंत्री, ऊर्जामंत्री, वा अर्थ व नियोजन या महत्वाच्या खात्यांचा कारभार त्यांनी पहिला. नुकतीच त्यांची निवड राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी निवड झाली आहे.

आमदार अनिल तटकरे (मोठा भाऊ)

सुनील तटकरे यांचे ज्येष्ठ बंधू अनिल तटकरे हे विधान परिषदेचे आमदार आहेत. कोकणातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघातून निवडून गेले आहेत. अनिल तटकरे यांची व त्यांच्या कुटुंबाची राजकीय महत्त्वाकांक्षा सुनील तटकरे यांच्यासाठी कायमच अडचणीचा मुद्दा राहिला आहे.

अवधूत तटकरे

आमदार अवधूत तटकरे, तटकरे कुटुंबातील एक बडे प्रस्थ. रोह्य़ाचे माजी नगराध्यक्ष, विद्यमान आमदार, प्रशासन आणि पक्षात दबदबा असणारे व्यक्तिमत्त्व आहे. सुनील तटकरे यांची विधान परिषदेवर वर्णी लावून घेतल्यावर आमदारकी आपल्यालाच मिळाली पाहिजे, असा उभा दावा करीत अवधूत यांनी काकालाच आव्हान दिले होते.

अनिकेत तटकरे (मुलगा)

अवधूत तटकरे यांची नाराजी सुनील तटकरे यांच्यासाठी डोकेदुखीचा विषय ठरला . अवधूत याच्या नाराजीनंतर अनिकेतला रोह्य़ाच्या राजकारणात आणण्याचा निर्णय घेतला. अनिकेत सध्या विधान परिषदेचे उमेदवार म्हणून तिकीट मिळाल्यानंतर पुन्हा चर्चेत आले आहेत.

शुभदा तटकरे (अनिल तटकरे यांच्या पत्नी)

शुभदा तटकरे यांनी जिल्हा परिषदेवर काम केलं आहे. त्यांनी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापतिपदावर काम केले आहे. मात्र सध्या जिल्हा परिषदेच्या व पक्षांतर्गत कामकाजात त्या फारशा सक्रिय नसतात.

संदीप तटकरे (पुतण्या)

रोहा नगराध्यक्षपदासाठी संदीप यांना उमेदवारी मिळावी यासाठी वडील अनिल तटकरे आणि भाऊ अवधूत आग्रही होते. मात्र सुनील तटकरे यांनी व्याही संतोष पोटफोडे यांना उमेदवारी दिली. संदीप यांच्या उमेदवारीचा वाद चांगलाच रंगला होता. हा वाद निर्माण झाल्यानंतर संदीप शिवसेनेत देखील गेले होते. वाद टोकाला गेल्यानंतर दस्तुरखुद्द शरद पवारांना या वादात मध्यस्थी करावी लागली होती.

अदिती तटकरे

आदिती तटकरे या सुनील तटकरे यांच्या कन्या आहेत, राष्ट्रवादी युवती काँग्रेसची कोकण संघटक, खासदार सुप्रिया सुळे यांच्या निकटवर्तीय आणि तटकरे यांची राजकीय वारसदार म्हणून आदितीकडे बघितले जाते. अदिती तटकरे या सध्या रायगड जिल्हापरिषदेच्या विद्यमान अध्यक्ष आहेत.

सर्व नेते आपल्याबाजूने जनतेचा विकास करण्यासाठी काम करत असतात. मात्र, हा विकास होत असताना सामान्य कार्यकर्त्यांनाही न्याय मिळणे गरजेच आहे, त्यामुळे ‘राजा हा राजाच्या पोटी नव्हे, तर मतपेटीतून जन्माला यावा’ असे सांगणारे भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारला अनुसरून आम्ही हे सदर सुरु करत आहोत

अश्याच पद्धतीने तुमच्या भागात असणाऱ्या राजकीय घराणेशाहीची माहिती तुम्ही आम्हाला पाठवू शकता. आमच्या [email protected] या मेलआयडीवर आपण हि माहिती पाठवा. सत्यता पडताळून आम्ही तुमचे नाव गुप्त ठेवून बातमीला प्रसिद्धी देऊ.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

पंतप्रधान मोदी छत्रपती शिवाजी तर शहा तानाजींच्या रुपात; शिवसेनेच्या ढाण्या वाघाची पहिली प्रतिक्रिया
कोणाशीही आणि कशीही युती करेन पण एकदा दिल्लीला जाणारच : महादेव जानकर
'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
मुस्लिमांच्या आग्रहामुळे शिवसेनेसोबत सत्ता स्थापन केली?
तुम्ही काय केलं ते आधी सांगा;शिवेसेनेचा देवेंद्र फडणवीसांना सवाल
चव्हाणांच्या गौप्यस्फोटावर खडसे  म्हणतात...
बाळासाहेब थोरातांचा स्वबळाचा नारा
तर शिवसेनाही स्वबळावर लढायला तयार; सर्व ११५ जागा लढवणार
मुंबईची माहिती नाही तेच 'नाईट लाईफ'ला विरोध करत आहेत - प्रकाश आंबेडकर
भागवत यांना किती मुलं आहेत हे मला माहित नाही; त्यांनी नसत्या उठाठेव करू नये