VIDEO: पतसंस्था ठेवीदारांचे उपोषण लेखी आश्वासनानंतर सुटले

नेवासा / भागवत दाभाडे : श्री व्यंकटेश सहकारी पतसंस्था मध्ये अडकलेल्या ठेवी परत मिळत नसल्याच्या निषेधार्त सोनई येथे ठेवीदारांनी पतसंस्थेसमोर अमोरण उपोषण सायंकाळी सहायक निबंधक सहकारी श्री. नागरोजे यांच्या लेखी आश्वासनानंतर लिंबू पाणी देऊन सोडण्यात आले.

व्यंकटेश पतसंस्थेत दीड वर्षांपासून ठेवीदारांना ठेवीची पैसे परत मिळत नसल्यामुळे ठेवीदार अजित बडे व सहकार्यांनी उपोषण सुरू केले होते. सोनईत दिवसभर हा चर्चेचा विषय ठरला होता. उपोषण सुरू झाल्यानंतर अनेक वृद्ध, माहिलांनी भेट देत उपोषणात सहभाग घेतला.उपोषणार्थी संजय भळगट, अजित बडे,अशोक हलाल, अभय भळगट, सुभाष लुनिया, रामेश्वर सुद्रीक, कुंतीलाल भळगट, श्रेणीक भळगट, बाबासाहेब धाडगे, शंकरराव तेलोरे, प्रल्हाद वाबळे, भाऊसाहेब हरकळे,आदींनी तीव्र भावना व्यक्त केल्या.

सहायक निबंधक यांनी पत्रात म्हटले आहे की व्यंकटेश पतसंस्थेच्या चौकशीसाठी चौकशी अधिकारि यांची नेमणूक करण्यात आली आहे.लेखा परीक्षक एस एस सोमाणी यांनी मार्च 2017 पर्यंतचे लेखा परिक्षणाचे अहवाल सादर करण्याचे दूरध्वनी द्वारे कळवले आहे. अहवालाच्या अनुषंगाने संबंधितांवर एफ आर आय दाखल करण्याचे अधिकार लेखा परीक्षकांना तात्काळ आदेश देण्यात आले आहे.

पहा काय आहेत ठेवीदारांच्या भावना 

 

You might also like
Comments
Loading...