स्मृती इराणींच्या सभेकडे मतदारांची पाठ , खुर्च्या रिकाम्या

Smriti-Irani_ 1

टीम महाराष्ट्र देशा:- दिवंगत भाजपा खासदार चिंतामण वणगा यांच्या आकस्मित मृत्यू नंतर होत असलेल्या पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत प्रचार रंगात आला असून शिवसेना व भाजपा यांनी ही जागा प्रतिष्ठेची केली आहे. या निवडणुकीत दिवंगत खासदार वणगा यांच्या मुलाला शिवसेनेने उमेदवारी देऊन रिंगणात उतरवले असून भाजपचे उमेदवार राजेंद्र गावित हे आहेत, आज यांच्या प्रचारासाठी डहाणू येथे खास दिल्लीहून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची सभा आयोजित केली होती, परंतु या सभेला लोक न जमल्याने निम्म्या खुर्च्या रिकाम्या राहिल्याने भाजपा कार्यकर्त्यांची मोठी गोची झाली.

सुमारे दहा हजार लोक बसतील अशी व्यवस्था या सभा मंडपात करण्यात आली होती. परंतु पाच ते सहा हजारच लोक जमल्याने भाजपाची नामुष्की झाली. पालघरची जागा कोणत्याही परिस्थितीत पुन्हा भाजपकडे राखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. स्वत: मुख्यमंत्र्यांबरोबर गिरीश महाजन यांनीही पालघर जिल्ह्यात ठाण मांडले असून, शिवसेनेने मोठे आव्हान उभे केल्याने भाजपने मोठा फौजफाटा कामाला लावला आहे.

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांपाठोपाठ आज डहाणूत मंत्री स्मृती इराणी आल्या होत्या. डहाणूतील रामवाडी (पूर्व) येथे राजेंद्र गावित यांच्यासाठी सभा आयोजित केली होती. मात्र या सभेसाठी लोक जमले नाहीत त्यामुळे सभेत निम्या खुर्च्या रिकाम्या होत्या. डहाणू हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. स्वत: चिंतामन वनगा एकेकाळच्या डहाणू लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते.

डहाणूत पास्कल धनारे भाजपचे आमदार आहे. इराणींच्या सभेत खुर्च्या रिकाम्याच कशा राहिल्या याची चर्चा राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. कदाचित दिवंगत वणगा यांच्या मुलासाठी सहानुभूती म्हणून भाजपाच्याच स्थानिक नेत्यांनी गावित यांना नाकारले तर नाही असा छुपा प्रश्न इथे विचारला जात आहे.Loading…
Loading...