श्रीरामपूरमध्ये भुयारी गटार योजना ‘पाण्यात’ ; हजारो लिटर पाण्याची रोज नासाडी

पालिका प्रशासन अनभिज्ञ

श्रीरामपूर/राजेश बोरुडे: शहराच्या उत्तर भागात पालिका हद्द संपते त्या दरम्यान गोंधवनी रस्त्यालगत भुयार गटार योजनासदृश्य पाइपमधून मागील अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात अविरत स्वच्छ पाण्याचा प्रवाह सुरु असून रोज हजारो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. विशेष म्हणजे भुयार गटार योजना अजून कार्यान्वितही झालेली नसताना पाईपमधून स्वच्छ पाण्याचा प्रवाह सातत्त्याने सुरु आहे.

शहराच्या उत्तर भागातील अंतर्गत भूमिगत गटार योजनेचे अंतिम टोक असलेल्या भूमिगत गटार योजनासदृश्य पाइपमधून मागील अनेक दिवसांपासून कमीअदिक दाबाने शुद्ध पाणी वाहत असून हे स्वच्छ पाणी पुढे जाऊन गटारीच्या घाण पाण्यात मिळते. रोज हजारो लिटर शुद्ध पाण्याचा अपव्यय होत असताना पालिका प्रशासनाने सदर पाणी नेमके कुठून येते ? कसकाय येते ? का येते ?याचा शोध घेण्याची साधी तसदीही घेतली नाही. रोज असे हजारो लिटर वाया जाणारे स्वच्छ पाणी जर पुन्हा साठवण तलावात सोडण्याची व्यवस्था केली तर पाण्याची मोठी बचत होऊ शकते. सदर वाया जाणारे स्वच्छ पाणी हे पालिकेच्या अद्यापपर्यंत कार्यान्वित न झालेल्या भूमिगत गटार योजनेच्याच पाईपमधून वाहत असेल तर हि अतिशय गंभीर स्वरूपाची बाब असून आजपर्यंत लाखो लिटर स्वच्छ पाणी वाया जाण्यास पालिका प्रशासनच जबाबदार असल्याचे सिद्ध होते. पाण्याची बचत व्हावी म्हणून पालिका दर शनिवारी कोरडा दिवस पाळून आठवड्यातून एकदा शहराचा पाणी पुरवठा बंद ठेवते. पाण्याची बचत करण्याचे नागरिकांना वारंवार अवाहन करणाऱ्या पालिकेला मागील अनेक महिन्यांपासून अविरत लाखो लिटर स्वच्छ पाण्याची होणारी नासाडी दिसत का नाही असा प्रश्न याठिकाणी उपस्थित होत आहे.

You might also like
Comments
Loading...