‘या’ कारणामुळे झाला गणेश भूतकरचा खून

shanishingnapur-murder-case

सोनई: नेवासा तालुक्यातील शनी शिंगणापुर येथे शेतीच्या वादातून गणेश भूतकर वय (34) याचा मंगळवारी खून करण्यात आला होता. याप्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.

अविनाश चांगदेव बानकर, पंकज बानकर, अर्जुन महाले, लखन ढगे, मयूर हरकल, भाऊराव ढमाले, गणेश सोनवणे यांच्यावर शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यात मयत गणेशाचा भाऊ रामेश्वर भूतकर यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान गुरुवारी दुपारी मयत गणेश भूतकरवर अंत्यसंस्कार करण्यात आले, शनिशिंगणापूर येथील दुकाने दुपारपर्यंत बंद होते.

गणेश भूतकर ,अविनाश बानकर, गणेश सोनवणे, या तिघांमध्ये, शिंगणापुर शिवारात शेती विकत घेतली होती.ती अविनाश बानकर याने त्याच्या नावे केली होती त्यावरून गणेश भूतकर अविनाश बानकर यांच्यात वाद चालू होते.