fbpx

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नांदूर शिकारी येथे सावित्रीबाई फुलेंची जयंती साजरी

नेवासा / भागवत दाभाडे:  नेवासा तालुक्यातील आदर्श असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नांदूर शिकारी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. पाचेगावकर मॅडम होत्या . सौ.माने मॅडम यांनी कार्यक्रमाचे प्रास्तविक केले. उर्मिला धुमाळ, दीपाली लिपणे, ऋतुजा गवारे, आदी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले आहे.

यावेळी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक श्री. नामदेव धायतडक सर , गायकवाड सर, घुले सर, काशीद सर, राऊत सर, बोरुडे सर यांनी सावित्री बाई फुले यांच्या कार्याविषयी माहिती देऊन मनोगत व्यक्त केली.
सामाजिक कार्य करणाऱ्या द्रोपदाबाई दाभाडे , शहाबाई शिरसाठ , शांताबाई शिरसाठ यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमास अंगणवाडी सेविका रुख्मिणी खाटीक, शोभा दाभाडे, हिराबाई लिपणे, संगीता खलाटे, अनिता लिपणे, कडूबाई गवळी आदी महिला व पालक , विद्यार्थी उपस्थित होते. सहावीची विद्यार्थिनी निकिता लिपणे हिने सूत्रसंचालन केले व निकिता खालाटे ने आभार मानले