गुढे नगरीत सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

savitribai fule
टीम महाराष्ट्र देशा- सावित्रीबाई फुले जयंती निमित्त गुढे गावात भव्य मिरवणूक काढण्यात आली.भीमा कोरेगाव च्या हुतात्म्यांना सुद्धा आदरांजली वाहण्यात आली . जातीय दंगलीचा तितक्याच तीव्रतेने निषेध सुद्धा नोंदवण्यात आला.ह्या धर्तीवर गावातल्या सगळ्याच समाजाच्या बांधवांनी सक्रिय सहभाग घेऊन शोभयात्रेला मूर्तिमंत रूप प्राप्त करून दिले.
savitri
छोट्या सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेतील सर्वांची मने जिंकून घेतली . सुरुवातीला महात्मा ज्योतिराव फुले प्रवेशद्वारास श्रीफळ अर्पण करून जनसमुदाय आंबेडकरांच्या पुतळ्याकडे वळला तिथे फुलहार चढवून गावाच्या मध्यभागी असलेल्या शिवरायांच्या स्मारकाला विनम्र अभिवादन करून पुन्हा सावता मंदिराकडे मिरवणुकीची सांगता झाली.
समारोप प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य नानासाहेब डॉ.उत्तमराव धनाजी महाजन यांनी मार्गदर्शन केले नंतर अ.भा.वि.प. सिंहगड भाग मंत्री(पुणे) भूषण ईश्वर महाजन,आनंदा महाजन, समता परिषद तालुका अध्यक्ष भगवान महाजन यांनीही आपले विचार मांडले,सूत्रसंचालन आनंदा महाजन यांनी केले,विशेष उपस्थित महिला – कलाबाई महाजन,कमलबाई महाजन,माजी संरपच प्रतिभा महाजन,शोभाबाई डहाळे,आशाबाई माळी,सुदंरबाई माळी ,लिलाबाई माळी,कलाबाई शिंपी,लताबाई महाजन.डॉ.हरीशचंद्र उत्तमराव महाजन,दिलीप देविदास पाटील,भैय्यासाहेब सुधाकर पाटील,तुकाराम हिलाल माळी, दादा भिला पाटील,छत्रपती सेना महाराष्ट्र राज्य प्रसिद्धि प्रमुख देवा माळी, भगवान महाजन,कैलास महाजन,रघुनाथ महाजन,भालचंद्र शिंपी,आधार मोरे,योगेश माळी,ईश्वर महाजन,पंढरीनाथ माळी,शशिकांत महाजन,राहुल महाजन,हिम्मत महाजन,गजानन महाजन.राहुल शालीक महाजन, संजय भिकन माळी, शाम सोनार, नारायण माळी, हिंमत माळी, गंगाधर महाजन, अंकुश माळी, भावराव माळी, पंडीत माळी, भाऊसाहेब माळी, समाधान माळी, अनिल खैरनार,राहुल महाजन, मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.