सुशांत मोरेंच्या आरोपांबाबत मुख्याधिका-यांची सारवा-सारव

सातारा : सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी बोगस बिलांचे काय पुरावे दिलेत हे माहीत नाही.मात्र हे चुकीचे असून आमचाकडे असे कधी होत नाही, असे म्हणून सातारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी झालेल्या आरोपांबाबत सारवा-सारव केली.

साता-यातील सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी पत्रकार परिषद घेवून सातारा नगरपालिकेच्या मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी आपल्या पदाचा गैर वापर करत नगराध्यक्षांची स्वाक्षरी न घेताच लाखो रुपयांची बिले काढली असल्याचा धक्कादायक आरोप करुन तसे माहिती अधिकारात माहिती घेवून पुरावेच पत्रकार परिषदेत सादर केले होते.यात महाराष्ट्र नगर पालिका अधिनियमातील कोडचे उल्लघंन केल्याचा आरोप करत मुख्याधिका-यांना तत्काळ निलंबित करुन त्यांचावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी ही मोरे यांनी केली.

या आरोपांबाबत मुख्याधिकारी शंकर गोरे यांच्याशी दुरध्वनीवरुन संपर्क साधला असता त्यांनी सुशांत मोरे यांचे आरोप चुकीचे असून त्यांनी कोणती कागदपत्रे पुराव्यात दिली हे माहित नसून आमच्याकडे  अस कधी होत नाही अस म्हणून सारवा-सारव केली.

You might also like
Comments
Loading...