आणखी एका अधिकाऱ्याने टाकला लेटरबॉम्ब; काँग्रेसच्या नेत्यावर केले गंभीर आरोप

sanjeev jayswal

ठाणे – महाराष्ट्रात अधिकाऱ्यांनी नेत्यांवर आरोप करण्याचा सिलसिला सुरूच असल्याचे चित्र आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप केल्यानंतर आणखी एका अधिकाऱ्याने एका कॉंग्रेसच्या नेत्यावर गंभीर आरोप केले आहेत. ठाण्याचे माजी आयुक्त संजीव जयस्वाल यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले ठाण्यातील काँग्रेसचे माजी नगरसेवक संजय घाडीगावकर याच्यावर गंभीर आरोप करत तक्रार केली आहे.

संजीव जयस्वाल यांनी मुख्यमंत्र्यांना लिहलेल्या पत्रात संजय घाडीगांवकर हे एक खंडणीखोर, ब्लॅकमेलर, गुंड असल्याचा आरोप केला आहे. सूरज परमार प्रकरणात ज्या चार नेत्यांना अटक करण्यात आली होती. ते काँग्रेसचे नगरसेवक विक्रांत चव्हाण, मनसेचे नगरसेवक सुधाकर चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक हनमंत जगदाळे आणि नजीब मुल्ला हे गोल्डन गॅंग चालवत असल्याचं संजीव जयस्वाल यांनी त्यांच्या पत्रात म्हटलं आहे. तसंच संजय घाडीगावकर देखील यामध्ये सामील आहेत असं जयस्वाल यांनी म्हटलं आहे.

घाडीगावकर यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात आल्याने आणि त्यांना पुढील ६ वर्षे निवडणुक लढविता येणार नसल्याने, तसेच माझ्या कार्यकाळात हाफ्तेखोरीला लगाम लावल्यानेच त्याचा राग मनात धरूनच घाडीगावकर यांनी तक्रार केल्याचा खुलासा त्यांनी केला आहे.

दरम्यान, माजी नगरसेवक संजय घाडीगावकर यांनी संजीव जयस्वाल यांच्यावर आरोप केले होते. यामध्ये त्यांनी संजीव जयस्वाल ५ वर्षे ३ महिने ठाण्याचे आयुक्त आतांना त्यांच्याविरोधात महिलेने तक्रार केली आहे तसंच संजीव जयस्वाल यांनी गैरव्यवहार करून संपत्ती गोळा केली आहे. याची चौकशी व्हावी असा आरोप करत चौकशीची मागणी केली होती. या आरोपांना उत्तर देताना संजीव जयस्वाल यांनी हे गंभीर आरोप केले आहेत.

महत्वाच्या बातम्या

IMP