महापुरात शेतजमीन वाहून गेली, साखर हंगाम संकटात

टीम महाराष्ट्र देशा- कृष्णा आणि वारणा नदीला आलेल्या महापुरामुळे सांगली जिल्ह्यात नदीकाठावरील जमीन पिकासह वाहून गेली आहे. ऊस हे मुख्य पीक वाहून गेल्यामुळं या भागातला साखर हंगाम संकटात सापडला आहे. सांगली जिल्ह्यातल्या वाळवा, शिराळा, पलूस आणि मिरज तालुक्यात सर्वाधिक उसाच क्षेत्र आहे. मात्र, पुरामुळे ऊस पीक मोठ्या प्रमाणात महापुरात वाहून गेल आहे.

जिल्ह्यातल्या चार तालुक्यांत दहा साखर कारखाने असून दुष्काळी भागातील सात साखर कारखान्यांना याच क्षेत्रातून उसाचा पुरवठा केला जातो. पुरेसा ऊस नसेल तर साखर कारखान्यांचे गळीत हंगाम सुरु करणे इथल्या कारखान्यांसाठी अवघड होणार असल्याचं आमच्या वार्ताहारानं कळवलं आहे.

संकटग्रस्त भागांतील लोकांना लवकर मदत पोहोचावी अशी लोकांची अपेक्षा असताना राजकीय पक्ष मात्र आरोप प्रत्यारोप करण्यात दंग असल्याचे पहायला मिळत आहे. कर्नाटकातील अलमट्टी धरणाची वाढवलेली उंची आणि २००५ ची पूर रेषा यामुळे सांगली, कोल्हापूर भागात महापूर आला. त्यावेळी सत्तेवर असलेली काँग्रेसचं या महापुरासाठी जबाबदार आहे, असा दावा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला. तर दुसऱ्यांचे पक्ष फोडण्याच्या नादात भाजपला अलमट्टीचा विसर पडला, असा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला.

महत्वाच्या बातम्या