fbpx

वाळू माफियांपासून रक्षणासाठी महसूल अधिकाऱ्यांना आता खासगी सुरक्षारक्षक – चंद्रकांत पाटील

चंद्रकांत पाटील

धुळे: वाळू उपशाबाबत राज्य शासन लवकरच कडक धोरण जाहीर करणार आहे. महसूल अधिकाऱ्यांना वाळूमाफियांपासून संरक्षणासाठी खासगी सुरक्षारक्षक घेण्यास मंजुरी देऊ, असे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे.चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत येथील जिल्हाधिकारी कार्यालयात धुळे, नंदुरबार जिल्ह्यांतील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांसमवेत आढावा बैठक झाली. त्या वेळी ते बोलत होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले, की वाळूबाबतच्या नव्या धोरणात कुठे वाळू उत्खनन करावे, कुठे करू नये याबाबतच्या नियमांचा समावेश असेल. वाळूच्या महसुलातून संबंधित ग्रामपंचायतींना 25 टक्के महसूल देण्याचे नियोजन आहे. महसूल अधिकाऱ्यांना खासगी सुरक्षा घेण्यासाठी परवानगी देण्यात येईल.आगामी तीन वर्षांत राज्यांत वेगवेगळ्या माध्यमांतून सुमारे दोन लाख कोटी रुपयांचे रस्ते होतील, असेही त्यांनी सांगितले.