भाजपचे ‘गडकरी प्रेम’ म्हणजे केवळ मगरीचे अश्रू?

गडकरींचा पुतळा बसवण्याच्या आश्वासनाचा भाजपला विसर

पुणे – महापालिकेत आमची सत्ता आल्यानंतर संभाजी उद्यानात साहित्यिक राम गणेश गडकरी यांचा पुतळा बसवू, अशी छातीठोकपणे घोषणा भारतीय जनता पक्षाने केली होती. मात्र हि घोषणा हवेतच विरल्याच चित्र आहे .पुतळा फोडून वर्ष पूर्ण झाले तरी अद्याप गडकरी यांच्या पुतळ्याबाबत महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी निर्णय घेतला नाही. त्यामुळे भाजपचे गडकरी प्रेम हे केवळ मगरीचे अश्रू होते का असा सवाल निर्माण झाला आहे. गडकरी यांचा पुतळा केव्हा बसवणार, असा प्रश्न पुन्हा एकदा सांस्कृतिक क्षेत्रातून तसेच गडकरी प्रेमींकडून उपस्थित होत आहे.

Ram-Ganesh-Gadkari

bagdure

संभाजी उद्यानातील राम गणेश गडकरी यांचा पुतळा काही संघटनेच्या कार्यकर्त्यांनी फोडला. या घटनेला वर्ष पूर्ण झाले आहे. त्यातच गडकरी यांचा मंगळवारी (ता. 23) स्मृतिदिन आहे. या पार्श्वभूमीवर, त्यांच्या पुतळ्याचा मुद्दा पुन्हा समोर आला आहे. नाट्य परिषद कोथरूड शाखेचे अध्यक्ष सुनील महाजन म्हणाले, पुतळा पुन्हा बसवावा म्हणून आम्ही मुख्यमंत्री, सांस्कृतिक कार्यमंत्री, महापौर यांना सर्व कलावंतांच्या वतीने पत्र दिले होते. त्यानंतर पुतळा बसवावा, असा सर्व पक्षीय ठरावही पालिकेत मांडण्यात आला होता; पण पुतळा अद्याप बसवला गेला नाही. यासंदर्भात राज्यकर्ते आणि प्रशासनाकडून अधिक वेळकाढूपणा होऊ नये. तातडीने पुतळा बसविण्यात यावा आम्ही पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ आणि हा प्रश्न निकालात काढण्याची मागणी करणार आहोत ”

कलावंतांनी स्वखर्चाने गडकरी यांचा पुतळा तयार करून तो पालिकेला दिला होता. तरीही तो बसविला नाही. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून पुतळ्याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे महापौर मुक्ता टिळक यांनी जाहीर केले होते. मात्र, कार्यवाही झाली नाही. दरम्यान,राम गणेश गडकरी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आहे संभाजी बागेतील त्यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी गेलेल्या अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या कार्यकर्त्याना पोलिसांनी रोखले. हे कार्यकर्ते आज सकाळी उद्यानात जाण्याच्या प्रयत्नात असताना उद्यान निरीक्षकाने त्यांना आत जाण्यापासून रोखले आणि पोलिसांना बोलावले. दरम्यान गडकरींच्या पुतळ्याला अभिवादन करण्यापासून आम्हाला का रोखले जाते, असा सवाल उपस्थित करत महिनाभरात गडकरींचा पुतळा बसवावा अन्यथा ब्राम्हण महासंघ स्वतः हा पुतळा बसवेल असा इशारा देण्यात आला आहे.

You might also like
Comments
Loading...