रिपब्लिकन ऐक्यासाठी रामदास आठवले व डॉ. राजेंद्र गवई यांच्यात एकमत

rajendra gavai and ramdas aathavale

मुंबई : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील व्यापक रिपब्लिकन पक्ष स्थापन करण्यासाठी आणि सर्व बहुजनांना सोबत घेऊन रिपाइंला सत्ता पोहोचविण्यासाठी रिपब्लिकन ऐक्याशिवाय अन्य कोणताही समर्थ पर्याय समाजासमोर नसल्याचे सांगत रिपब्लिकन ऐक्यासाठी आपण सदैव तयार आहोत असे सांगत रिपब्लिकन ऐक्याचा प्रस्ताव आपण स्वीकारत असल्याचे मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रिपाइंच्या गवई गटाचे सरचिटणीस डॉ. राजेंद्र गवई यांच्याकडे व्यक्त केले.

बांद्रा येथे आठवले आणि डॉ. राजेंद्र गवई यांच्यात रिपब्लिकन ऐक्यासाठी सकारात्मक चर्चा झाली. यावेळी झालेल्या चर्चेत रिपब्लिकन ऐक्यासाठी प्रकाश आंबेडकर आणि आठवले यांनी एकत्र येणे महत्वाचे आहे. या दोघांशिवाय रिपब्लिकन ऐक्य अपूर्ण आहे. रिपब्लिकन ऐक्याचे हे दोघे नेते दोन आधारस्तंभ असून त्यातील आठवले ऐक्याला तयार असल्याची सकारात्मक बाजू समाजासमोर आली आहे. आता ऐक्यासाठी प्रकाश आंबेडकरांना प्रस्ताव देण्यासाठी आपण त्यांची लवकरच भेट घेणार असल्याचे डॉ. राजेंद्र गवई म्हणाले.

Loading...

आठवले आणि गवई यांच्यात भीमकोरेगाव हल्ला प्रकरण त्यानंतरचा महाराष्ट्र बंद आणि त्यात आंदोलकांवर झालेली कारवाई बाबत चर्चा झाली. महाराष्ट्र बंद आंदोलनातील कार्यकर्त्यांवरील कलम ३०७ आणि १९५ चे गुन्हे काढून टाकण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी आपणास आश्वासन दिले आहे. तसेच यासंदर्भातील आंबेडकरी आंदोलकांवरील सर्वच खटले सरकारने काढून टाकावेत अशी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली असल्याचे व त्याबाबत मुख्यमंत्री सकारात्मकअसल्याची माहिती आठवले यांनी डॉ राजेंद्र गवई यांना दिली आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
घ्या आता ! इंदुरीकर म्हणाले, मी असं बोललोच नाही
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
शरद पवार होणार निवृत्त ? पुन्हा राज्यसभेबाबत सस्पेन्स कायम
म्हणून नारायण राणे यांचा जळफळाट होतोय, शिवसेनेचा ढाण्या वाघ राणेंवर गरजला
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई
चुकीला माफी नाही ! आदित्य ठाकरे यांनी केले दिल्लीतील 'त्या' अधिकाऱ्याला निलंबित
ही सदिच्छा भेट आहे. बाकी तपशिलात खोल शिरण्याची गरज नाही - खा. संजय राऊत