प्रणिती शिंदेंविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल

टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्र आणि हरयाणातील विधानसभा निवडणुकांची घोषणा निवडणूक आयोगाकडून करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुक ही एकाच टप्प्यात होणार आहेत. त्या २१ ऑक्टोबरला तर मतमोजणी २४ ऑक्टोबरला होणार आहे. तसेच दोनही राज्यात आचारसंहिता जाहीर झाली आहे.

याच पार्श्वभूमीवर कॉंग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आमदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल करण्यात आली आहे. शिंदे यांनी मतदारांना मेकअप बॉक्स वाटल्याची तक्रार माजी आमदार नरसय्या आडम यांनी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्याकडे केली आहे. त्यामुळे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

Loading...

नरसय्या आडम यांनी निवडणूक आयोगाने आचारसंहिता लागू होण्याची घोषण केली असतानाही, प्रणिती शिंदे यांचे कार्यकर्ते दुपारी साडेबारा वाजता सोलापूर शहर मध्य या मतदारसंघात मेकअप बॉक्स वाटत होत्या असा आरोप केला आहे. त्यामुळे मतदारांना मेकअप बॉक्स देऊन आचारसंहिता भंग केल्याची तक्रार आडम यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे केली.

दरम्यान, यावर भाष्य करताना प्रणिती शिंदे यांनी आडम यांच्या आरोपात तथ्य नाही. मी दरवर्षी कृतज्ञता व्यक्त करत असते, मी नेहमीच महिलांना या गोष्टी देत असते. केवळ स्टंटबाजी म्हणून आडम यांनी कॅमेऱ्यासमोर आरोप केले आहेत अस विधान केले आहे.

महत्वाच्या बातम्या 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

आणि... अजित दादांमुळे मुख्यमंत्र्यांवर ओढविणारी नामुष्की टळली
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
महाविकास आघाडीचे 'जनक देवेंद्र फडणवीस' आहेत : शिवाजीराव आढळराव पाटील
...अन्यथा इंदोरीकरांच्या तोंडाला काळं फासू; असा इशारा देणाऱ्या तृप्ती देसाईंवर मनसेच्या रणरागिणीचा प्रतिइशारा
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
'...यासाठी राज ठाकरेंची दहशत हवीच'
बालेकिल्ल्यात भाजपला धक्का; मेहतांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादी-सेनेची माफी मागत भाजप सोडली
'बोकड बांधा लागते, मसाले आणा लागते, गावात तेव्हा लोक 'मतदान' करतात' : बच्चू कडू
इंदुरीकर-देसाई वादात आता 'भोर' महाराजांची ऊडी ; देसाईंना कापून टाकण्याची धमकी