विक्रम मोडला : संसदेच २० वर्षातील सर्वाधिक कामकाज चालू सत्रात झालं

टीम महाराष्ट्र देशा- नेहमी खासदारांच्या गोंधळामुळे संसदेच्या कामकाजाची वेळ वाया गेल्याचं पहायला मिळत मात्र यंदाच्या चालू सत्रात काही वेगळ चित्र पहायला मिळाले आहे. सध्याच्या सतराव्या लोकसभेत गेल्या २० वर्षातील सर्वाधिक कामकाज झालं आहे. याबाबतच्या नोंदी ठेवणाऱ्या संस्थेच्या अहवालानुसार, गेल्या मंगळवारपर्यंत लोकसभेत १२८ टक्के कामकाज झालं.

गेल्या गुरुवारी शून्य प्रहराचं कामकाज चार तास ४८ मिनिटं चाललं आणि १६२ सदस्यांनी रात्री १० वाजून ५० मिनिटांपर्यंत विविध प्रश्न उपस्थित केले. लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी सदस्यांचं या दक्ष सहभागाबद्दल अभिनंदनही केल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.