इलाका तो कुत्तों का होता है, शेर का नही- देवेंद्र फडणवीस

वसई: पालघर लोकसभेच्या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने राजकीय पक्ष विशेषतः सेना-भाजप आमने-सामने आले आहेत. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वसई-विरारमध्ये जी सभा झाली त्यात मुख्यमंत्र्यांनी बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर आणि ठाकूर घराणाऱ्यावर हल्लाबोल केला.इलाका तो कुत्तों का होता है, शेर का नही. हम शेर है, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी ठाकूर घरण्यावर घणाघाती टीका केली.

नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस ?
“मी इकडे येत होतो, तेव्हा मला कोणीतरी विचारलं, देवेनभय्या कुठे निघालात? त्यावेळी मी सांगितलं सभेसाठी वसई-नालासोपाऱ्याला निघालोय. मग मला सांगण्यात आलं त्या भागात, त्या इलाक्यात का जाताय? तो परिसर, तो इलाका तर ‘शिट्टी’चा (ठाकूर घराण्याचा) आहे.मी सांगितलं, अरे इलाका तर कुत्र्या-मांजरीचा असतो, आम्ही तर वाघ आहे. वाघ जंगलाचा राजा असतो. त्याच्यासाठी कोणताच इलाका नसतो, पूर्ण जंगलच त्याचा इलाका असतो. वाघ जिथे जाईल तो भाग त्याचा होतो.

You might also like
Comments
Loading...