राजकारण करत असताना विरोधकाला शत्रू मानु नका – यशवंतराव गडाख

नेवासा/भागवत दाभाडे: राजकारण करत असताना विरोधकाला कधीच शत्रू मानु नका असे प्रतिपादन मा.खा.यशवंतराव गडाख यांनी केले.भेंडा बु. व भेंडा खु. ग्रामस्थांच्या वतीने माजी खासदार यशवंतराव गडाख यांचा अमृतमोहत्सवा निमित्त सत्कार करण्यात आला त्यावेळी गडाख बोलत होते.

मा.आ पांडुरंग अभंग कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. काशिनाथ नवले, भैय्यासाहेब देशमुख , दत्तुभाऊ काळे ,विश्वास गडाख, आदी व्यासपीठावर उपस्थित आहे.कार्यक्रमाचे प्रास्तविक नागेबाबा पतसंस्थेचे चेअरमन कडूभाऊ काळे यांनी केले. आदर्शगाव पाटोद्याचे सरपंच भास्करराव पेरे यांनी गावचा विकास व पर्यावरण संवर्धन याविषयी माहिती दिली . पेरे म्हणाले की गावात जास्तीत जास्त झाड लावले पाहिजे झाड लावल्याने पर्यावरणाचे संवर्धन होते.व गावच्या विकासासाठी व ग्रामस्थानी काम केले पाहिजे व लोकांचे हित पाहून सरपंचाने काम केले पाहिजे असे आव्हान सरपंच भास्कर पेरे यांनी केले.

मा.खा.गडाख म्हणाले की आमच्या काळात राजकारण वेगळं होत, पूर्वीसारखं राजकारण आता राहील नाही , राजकारण करत असताना विरोधक महत्वाचा आहे पण विरोधकाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे , त्याच्याकडे शत्रू म्हणून पाहणं चुकीचं आहे असे मा.खा.गडाख यांनी सांगितले
ते पुढे म्हणाले की समाजकारण करत असताना लोकांचे प्रश्न सोडवले पाहिजे व लोकांसाठी काम करणं महत्वाचं असल्याचं त्यांनी सांगितले.

सरपंच संगीता गव्हाणे, गणेश गव्हाणे, अशोक मिसाळ, तुकाराम मिसाळ, बाळासाहेब नवले, शिवाजी शिंदे, रावसाहेब कांगुणे , किशोर जोजार,बलभीम गव्हाणे, येडुभाऊ सोनवणे,शंकर भारस्कर, अशोक वायकर,शिवाजी पाठक, ईश्वर उगले, पांडुरंग होंडे,आदी उपस्थित होते.