वृक्ष लागवड मोहिमेला चळवळ बनवा-हभप उद्धव महाराज नेवासकर यांचे आवाहन

भागवत दाभाडे : नेवासा तालुक्यातील सुरेगावफाटा ते सुरेगाव या रस्त्यावर सुमारे दीड हजार वृक्षलागवड मोहिमेचा शुभारंभ सदगुरु नारायणगिरी महाराज प्रबोधन प्रतिष्ठानचे अध्यक्ष हभप उद्धव महाराज नेवासकर यांच्या हस्ते वृक्षलागवड मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.पर्यावरणाच्या संवर्धनासाठी वृक्षलागवड मोहिमेला चळवळ बनवा असे आवाहन हभप उद्धव महाराज यांनी यावेळी बोलतांना केले.

Loading...

सुरेगाव रस्त्यावरील सदगुरु नारायणगिरी महाराज प्रबोधन प्रतिष्ठान समोर झालेल्या कार्यक्रमा प्रसंगी अहमदनगर जिल्हा सामाजिक वनीकरण विभागाच्या सुरू करण्यात आलेल्या या मोहिमेच्या शुभारंभ प्रसंगी सहायक उपवन संरक्षक भगीरथ निमसे, सुरेगावचे सरपंच बद्रीनाथ शिंदे,वनक्षेत्रपाल गंगाधर सातपुते,वनरक्षक प्रमोद कदम,वनरक्षक लखन शिंदे,नेवासा येथील वसुंधरा सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष भैय्या कावरे,हभप सागर महाराज, महेश गवळी,सुरेगाव येथील युवा कार्यकर्ते विक्रांत शिंदे,शेतकरी लक्ष्मण शिंदे,मोहन शिंदे,ज्ञानेश्वर राजळे,विक्रांत शिंदे,चंद्रकांत शिंदे, सिंधुबाई शिंदे,प्रदीप शिंदे,बाबा शेळके यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना सामाजिक वनीकरण विभागाचे सहायक उपवन संरक्षक भगीरथ निमसे राज्याचे वनमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात या वर्षी तेरा कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने गावोगावी ही मोहीम सुरू केली असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

यावेळी बोलतांना सदगुरु नारायणगिरी महाराज प्रबोधन प्रतिष्ठानचे अध्यक्ष हभप उद्धव महाराज नेवासकर म्हणाले की ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ असा संदेश संतांनी याअगोदरच समाजाला दिला आहे आज पर्यावरणाचा प्रश्न गंभीर झाला असल्याने वृक्षलागवड करून वृक्षांची जोपासना करणे काळाची गरज बनली आहे.तेरा कोटी वृक्ष लागवड करण्याचे शासनाचे उदिष्ट असल्याने सर्वांनी वृक्षलागवड मोहिमेत राष्ट्रीय कर्तव्य समजून सहभागी व्हावे तसेच वृक्षलागवड मोहिमेला चळवळ बनविण्यासाठी सर्वांनी पुढे यावे असे आवाहन यावेळी बोलतांना केले.

यावेळी सुरेगाव सह पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.जेष्ठ पत्रकार सुधीर चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले व भैय्या कावरे यांनी आभार मानले.Loading…


Loading…

Loading...