महाराष्ट्रात 19 नक्षली ठार, 67 जणांना अटक व 22 चे आत्मसमर्पण

naxalites

नागपूर- पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यात पसरलेल्या नक्षल चळवळीचा बिमोड करण्यात पोलिसांना ब-यापैकी यश प्राप्त झाले आहे. गेल्या 2017 मध्ये पोलिसांनी तब्बल 19 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले असून 67 नक्षलवादी आणि समर्थकांना अटक केली आहे. तर 22 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केल्यामुळे नक्षल चळवळीला मोठा हादरा बसल्याचे चित्र आहे.

अंतर्गत सुरक्षेला आव्हान देणा-या नक्षल चळवळीने 1980 च्या दशकात देशातील आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, छत्तीसगडसह महाराष्ट्रतील गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, यवतमाळ आणि नांदेड या 6 जिल्ह्यात हातपाय पसरले होते. परंतु, पोलिसांच्या कामगिरीमुळे आता गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यापुरता नक्षलवाद शिल्लक राहिला असून 2017 मध्ये या चळवळीला पोलिसांनी मोठा हादरा दिला आहे. गेल्या वर्षभरात एकूण 19 नक्षल्यांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश मिळाले. यामध्ये 3 पोलिस शहीद झाले. पोलिसांनी 67 नक्षलवादी व त्यांच्या समर्थकांना अटक करण्यातही यश मिळविले आहे. तर 22 नक्षल्यांनी आत्मसमर्पणाचा मार्ग स्विकारला. त्यामुळे नक्षल चळवळीला मोठा फटका बसला. त्याचप्रमाणे 181 गावांनी गावबंदी ठराव करून नक्षल्यांना गावाबाहेरच रोखल्यामुळे नक्षल्यांचा जनाधार ओसरला. या वर्षात मोठ्या प्रमाणावर नक्षली मारल्यामुळे त्यांचे संख्याबळही कमी झाले आहे. एकीकडे शासनाच्या आत्मसमर्पण योजनेचा लाभ घेऊन अनेक जण समाजाच्या मुख्य प्रवाहात प्रवेश करीत असल्यामुळे नक्षल्यांना त्यांचे उर्वरीत संख्याबळही टिकवून ठेवणे कठीण झाले आहे. नक्षलग्रस्त व दुर्गम भागातील स्थानिक जनतेने नक्षल्यांना गावबंदी करून शासनाच्या विकासाला पाठींबा दिला आहे. त्यामुळे नक्षल भरतीसाठी तरूण मिळत नसल्याने नक्षल्यांची चळवळ कमकुवत झाली आहे.

Loading...

स्वतःचे अस्तित्व संपण्याच्या भितीमुळेच नक्षली सध्या भ्याड हल्ला करून निरापराध सामान्य नागरीकांचे बळी घेऊन दहशत माजविण्याचा प्रयत्न करीत आहेत. पोलिसांच्या यशस्वी रणनितीमुळेच नक्षल्यांचा मुख्य गड असलेल्या अबुझमाड जंगलातील शिबीर उध्वस्त झाले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये स्थानिक गावक-यांनी नक्षली बॅनर, नक्षल नेत्यांचे पुतळे जाळल्याने, तसेच नक्षल स्मारक तोडल्यामुळे उरलेला जनाधारही नक्षल्यांचा कमी झालेला आहे. त्यातच पोलिसांनी चहुबाजुने केलेल्या नाकेबंदीमुळे नक्षलवादी हतबल झालेले आहेत.

स्थानिकांचा पोलिसांवर विश्वास वाढला – शरद शेलार

पोलिसांना मिळालेल्या या यशाबद्दल बोलताना विशेष पोलिस महानिरीक्षक शरद शेलार यांनी सांगितले की, पोलिसांनी नक्षलग्रस्त व दुर्गम भागात जनसंपर्क वाढवून स्थानिक जनतेचा विश्वास संपादन केला. तसेच ग्रामभेट, जनजागरण मेळावे आदी उपक्रमाच्या माध्यमातून शासनाच्या विविध विभागांशी समन्वय ठेवून नागरीकांच्या समस्या पोलिसांकडून नियमित सोडविल्या जात असल्यामुळे जनतेचा शासनावर विश्वास वाढला आहे. नक्षली केवळ दिशाभुल करीत असल्याची जाणीव नक्षलग्रस्त भागातील नागरीकांना झाली असल्यामुळे त्यांनी शासनाच्या विकासाला होकार व नक्षल्यांना नकार दिल्याचे चित्र आहे.

Loading...
Loading...




Loading…




Top Posts

अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
आणि... अजित दादांमुळे मुख्यमंत्र्यांवर ओढविणारी नामुष्की टळली
राज्य सरकारला 'मोठा धक्का' ; अध्यादेश काढायला राज्यपालांनी नकार दिल्यामुळे आली नामुष्की
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
'भाजप-सेनेनं एकत्र यावं, मिळून सरकार स्थापन करु' ; NDAच्या बड्या नेत्याचं आवाहन
छगन भुजबळांच्या विरोधात गेला तो 'संपला' ! वाचा काय आहे प्रकरण
गृहमंत्री अमित शाह यांनी तातडीने राजीनामा द्यावा ,सुप्रिया सुळेंची मागणी
फडणवीस साहेब कदाचित आपला गजनी झालायं - रुपाली चाकणकर
बांगड्यांच्या वादात अमृता फडणवीसांची उडी, आदित्य ठाकरेंवर केला पलटवार
'बोकड बांधा लागते, मसाले आणा लागते, गावात तेव्हा लोक 'मतदान' करतात' : बच्चू कडू