काँग्रेसच्या माजी आमदारासाठी शिवसेनेच्या आमदाराचा आत्मदहनाचा इशारा!

करमाळा/ज्ञानेश्वर काशिद- कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती निवडी वेळी बागल गटाचे दिग्विजय बागल यांना झालेल्या मारहाण प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या माजी आमदार आणि कॉंग्रेस नेते जयवंतराव जगताप आणि इतर १३ जणांचे गुन्हे मागे घ्या अथवा सामुहिक आत्मदहन करण्याचा इशारा शिवसेना आमदार नारायण पाटील यांनी दिला.

करमाळा बाजार समिती सभापती निवडीच्यावेळी झालेल्या मारहाणी प्रकारणात जगताप गटाचे नेते माजी आमदार जयवंतराव जगताप करमाळ्याचे नगराध्यक्ष वैभव जगताप व इतर 12 जणांवरती भा दं वि 307 नुसार गुन्हे दाखल झाले होते या घटनेचा निषेध म्हणून आज करमाळा तहसील पुढे शिवसेनेचे आमदार नारायण पाटिल यांनी धरणे आंदोलन केले .

जगताप यांच्यावरील गुन्हे मागे घेतले नाही तर १९ अॉक्टोबरला सामुहिक आत्मदहन करण्याचा इशारा यावेळी त्यांनी दिला.या धरणे आंदोलनाला शहरातील विविध संघटना व पक्षाचा पाठिंबा होता.

Latur Advt
You might also like
Comments
Loading...