स्मार्ट सिटीच्या बैठकीत १३ सदस्यांनी तुकाराम मुंढेंना पाडले एकाकी;जाणून घ्या नेमकं काय आहे प्रकरण ?

tukaram mundhe

नागपूर : स्मार्ट अँण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या अर्थात स्मार्ट सिटी संचालक मंडळाच्या बैठकीत महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे पुन्हा एकाकी पडल्याचे पहायला मिळाले. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कंपनीचे सीईओ म्हणून घेतलेल्या निर्णयास मंजुरीसाठी शुक्रवारी प्रस्ताव सादर केला. मात्र स्मार्ट सिटी संचालक मंडळाच्या १३ सदस्यांनी प्रस्तावास मंजुरी प्रदान करण्यास नकार दिला.

तुकाराम मुंढे यांनी स्मार्ट सिटीचे सीईओपद नियमबाह्यरित्या बळकावल्याचा आरोप करण्यात आला होता. यानंतर झालेल्या बैठकीत आयुक्तांना सीईओपदावरून हटविण्यात आले. सीईओ म्हणून तुकाराम मुंढे यांनी घेतलेल्या कोणत्याही निर्णयांना संचालक मंडळाने मंजुरी दिली नाही. काही निर्णयाबाबत महाधिवक्ताकडून कायदेशीर सल्ला तसेच कंपनीबाबत न्यायालयात असलेल्या प्रकरणाचा निकाल लागेस्तोवर कुठलाही निर्णय घेऊ नये, असेही त्यावेळच्या बैठकीत निश्चित करण्यात आले होते.

दरम्यान, असे असतानाही मुंढे यांनी कंपनीचे चेअरमन प्रवीण परदेशी यांना दोन दिवसापूर्वी विषयपत्रिका पाठवून प्रशासनिक व आर्थिक निर्णयांना मंजुरी देण्याची सूचना केली होती. त्यानुसार शुक्रवार, ३१ जुलै रोजी बैठक आयोजित करण्यात आली. शुक्रवारी बैठकीत बैठकीच्या आयोजनावरच आक्षेप घेण्यात आला. दोनच दिवसांत या बैठकीचा अजेंडा तयार करण्यात आला. महापौर संदीप जोशी यांनी नोटीस काढून इतक्या घाईत बैठक घेण्याची गरज काय, असा सवाल केला.

प्रकल्पाचे अध्यक्ष प्रवीण परदेशी आणि दुसरे संचालक भारत सरकारचे सचिव दीपक कोचर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते. घाईत बैठक आयोजित केल्यामुळे अध्यक्षांनी नागपूरचे सिनिअर कौन्सिल एस.के. मिर्शा यांचे याबाबत मतदेखील घेतले. ‘उच्च न्यायालयात हे प्रकरण सुरू आहे. शिवाय यापूर्वीच्या बोर्ड मिटिंगमध्ये स्पष्टपणे म्हटलेले आहे की, अशा स्थितीत कायदेशीर मत घेण्यात यावे. त्यानंतर संचालकांच्या बैठकीत चर्चा व्हावी’ असे उत्तर मिर्शा यांनी दिले.

महत्वाच्या बातम्या नक्की वाचा –

‘राज्य सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत पाहू नये’

‘राजू शेट्टी भंपक माणूस आहे,गावात जसा सोडलेला वळू असतो तसा हा वळू आहे’

महविकास आघाडीची ‘नाचत येईना अंगण वाकडं’ अशी अवस्था: चंद्रकांत पाटलांचा टोला

राजू शेट्टी हे आता सरकारी आंदोलक झाले आहेत – देवेंद्र फडणवीस