सोलापुर जिल्ह्यात मराठ्यांनी रणशिंग फुंकले; पंढरीत मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर महासंकट

maratha kranti morcha

कुर्डूवाडी/हर्षल बागल : मराठा समाजाला दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करा यासह आदी मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाने सोलापूरातील शिवाजी चौकात चक्काजाम आंदोलन केले़ यावेळी आंदोलनकर्त्यांनी दोन एसटी गाड्यांची तोडफोड करून हिंसक वळण लावले़ . यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निषेधही करण्यात आला़ या मोर्चानंतर मराठा समाजातील कार्यकर्त्यांना शहर पोलीसांनी ताब्यात घेतले़.

सोलापूर : मराठा समाजाच्या चक्काजाम आंदोलनाला हिंसक वळण, दोन एसटी गाड्यांची तोडफोड

पंढरीत एकादशीला मुख्यमंत्री येणार असुन या दौऱ्याच्या पार्श्वभुमीवर मराठ्यांनी रणशिंग फुकंले आहे. जाठ पटेल यांच्या पेक्षाही आक्रमक मराठा आत्ता थेट रस्त्यावरची लढाई लढण्यासाठी एकजुट होतानाचे चित्र आहे. कसल्याही परिस्थितीमध्ये मुख्यमंत्र्यांना पंढरीत येऊ देणार नाही. असा आक्रमक पवित्रा सकल मराठा समाजाने घेतला आहे.

करमाळा , कुर्डूवाडी , मंगळवेढा सांगोला पंढरपुर , सोलापुर शहर , बार्शी ही मराठ्यांनी आंदोलनाची मुख्यस्थळे टार्गेट केली आहेत. जागोजागी ठिय्या आंदोलने तर कुठे रस्ते जाम करण्यात येत आहेत तर कुठे एसटी गाड्यांना मराठ्यांनी टार्गेट करुन सरकारला कोंडित पकडण्याचा डाव टाकला आहे. पंढरीत पुढे असणाऱ्या मराठा कार्यकर्त्यांना ऊच्च पोलिस अधिकाऱ्यांच्या सुचनेनुसार धरपकड चालु केली आहे. त्यामुळे मराठा समाजा संतापला असुन याचे तीव्र पडसाद आगामी एकादशी च्या मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर भमटण्याची चिन्हे दिसत आहेत.

मराठा क्रांती ठोक मोर्चाला परळीत सुरुवात

मराठा समाजाला त्वरीत आरक्षण द्यावे, मराठा विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्कातील ५० टक्के सवलतीची अंमलबजावणी न करणाऱ्या महाविद्यालयांची मान्यता रद्द करा, राज्य सरकारच्या नोकर भरतीत मराठयांसाठी घोषित केलेल्या १६ टक्के आरक्षणाचा सध्या चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनात अध्यादेश काढून त्यांचे त्वरीत कायद्यात रूपांतरण करावे, आण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेतंर्गत कर्ज देण्यासाठी बँकांना सक्तीचे आदेश द्यावेत अशा आशयाचे निवेदन मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने प्रशासनाला देण्यात आले़

महाराष्ट्रासह भारतात शांततामयरित्या निघालेला ५८ मराठा मुक मोर्चामुळे सामाजिक जीवन ढवळून गेलेले आहे़ सर्व मराठा मोर्चामध्ये मराठा आरक्षण व मराठा कुणबी समाज एकच असल्याचा प्राधान्याने उल्लेख झालेला आहे़ मराठा समाजाने मुंबई येथे काढलेल्या ५८ व्या मुक मोर्चावेळी शासनाच्यावतीने देण्यात आलेल्या आश्वासनाची पूर्तता अद्याप झालेली नाही़ म्हणून मराठा क्रांती मोर्चाच्या दुसºया पर्वाला तुळजापूरातून सुरूवात झालेली असून त्याचाच एक भाग म्हणून शनिवारी सकाळी ११ च्या सुमारास सोलापूर शहर व जिल्ह्यातील मराठा समाज बांधवानी चक्काजाम आंदोलन केले़.

मराठा आरक्षण : शिवसेना आमदारांचे विधानभवनात लाक्षणिक उपोषण

आ. भारत भालके यांनी मुख्यमंत्र्यांना सुचक सल्ला देत संदेश दिला आहे की , कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो त्यामुळे दौऱ्यावर येताना मुख्यमंत्र्यांनी विचार करावा असा थेट सल्लाच भालके यांनी दिला असल्यामुळे भालके देखील मराठा आंदोलनात सहभागी झाल्याचे चित्र दिसत आहे. मराठा तरुणांची होत असलेली धरपकड ही लोकशाहीला बाधक आहे असेही आ. भारत भालके यांनी महाराष्ट्र देशा टिम ला बोलताना व्यक्त केले आहे.