पुण्यात जनजीवन सुरळीत; मात्र बंद दरम्यान ५५ पीएमटी बसची तोडफोड

st todfod

पुणे: कोरेगाव भीमा घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या बंदच्या दरम्यान तब्बल ५५ पीएमटी बसची तोडफोड करण्यात आली आहे. तर शहरातील बस सेवा बंद ठेवण्यात आल्याने सुमारे दीड कोटींचे नुकसान झाल्याची माहिती पीएमपीएलचे व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंडे यांनी दिली आहे. दरम्यान सायंकाळी बंद माघे घेण्याचे आला असून सध्या जनजीवन पूर्वपदावर येत आहे.

शौर्यदीना निमित्त विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखो भीम अनुयायी भीमा कोरेगाव येथे आले होते. याच दरम्यान दोन गटांमध्ये अचानक झालेल्या दगडफेकीचे रूपांतर हिंसाचारात झाले. यामध्ये अनेक गाड्यांची तोडफोड करण्यात आली तर दोन युवकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेच्या निषेधार्थ आज आंबेडकरी संघटनांनी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. राज्यभरात बंदला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे.