माढा लोकसभा मतदारसंघातून मोर्चेबांधणीला सुरूवात

जेऊर- आगामी लोकसभा निवडणूकीसाठी माढा मतदारसंघातून मोर्चेबांधणीला सुरूवात झाली असून सर्व राजकीय पक्षांचे उमेदवारी अस्पष्ट असली तरी पारावरच्या गप्पा रंगात आलेल्या आहे.सध्यातरी कुठल्याही पक्ष्याने अधिकृत उमेदवारी जाहीर केलेली नसली तरी माढा लोकसभेला आपल्याला उमेदवारी मिळेल ह्या हेतूने गाव भेटी तसेच मोर्चेबांधणीला सुरूवात केलेली आहे.

२००४ मध्ये लोकसभा मतदारसंघाची पुर्नरचना झाल्यावर माढा हा नविन लोकसभा मतदारसंघ उदयास आला.२००९ लोकसभेला माढा लोकसभा मतदारसंघातून माजी केंद्रिय कृषी मंत्री शरद पवार यांनी त्यावेळचे भाजप उमेदवार आणि सध्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचा दारूण पराभव केला होता.

तर २०१४ लोकसभेला मोदी लाट असल्यामुळे माढ्याचे विद्यमान खासदार असलेले माजी केंद्रिय कृषी मंत्री शरद पवार यांनी माढा लोकसभा न लढविता राज्यसभेवर जाण्याचा निर्णय घेतला. २०१४ लोकसभा निवडणूकीत माढा मतदारसंघातून विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांना राष्ट्रवादीची उमेदवारी देण्यात आली तर सध्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे महायुतीचे उमेदवार होते. मोदी लाट असून ही मोहिते-पाटील आणि राष्ट्रवादीने करिष्मा करून महायुतीचे सदाभाऊ खोत यांचा जवळजवळ २८ हजार मतांनी पराभव झाला.आणि विजयसिंह मोहिते-पाटील माढ्यातून लोकसभेवर निवडून आले.

vijaysinh mohite patil
file photo

राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेला माढा लोकसभा मतदारसंघातून आगामी लोकसभेला कुणाला उमेदवारी मिळणार हे अजूनही अस्पष्ट असले तरी राष्ट्रवादीकडून विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांची उमेदवारी जवळजवळ निश्चित आहे तर भाजप कडून सहकार मंत्री सुभाष देशमुख, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत तसेच महायुती कडून दुग्ध, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे.तर शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी आगामी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढविण्याचा निर्णय घेतल्यामुळे शिवसेनेकडून सोलापूर जिल्हा प्रमुख धवलसिंह मोहिते-पाटील यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. तशी तयारी ही त्यांनी सुरू केलेली आहे . सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांनीही आगामी माढा लोकसभा लढविण्याच्या तयारीत आहेत. संजय शिंदे हे सध्या भाजप पुरस्कृत जि प अध्यक्ष असून त्यांनी अजून पर्यंत भाजप मध्ये प्रवेश केलेला नाही तर गावोगावी सुरू असलेल्या चर्चांमध्ये संजय शिंदे हे राष्ट्रवादी कडून लोकसभा लढविण्यास इच्छुक असल्याचे बोलले जात आहे.

You might also like
Comments
Loading...