बार्शी बाजार समितीवर राऊत गटाला सर्वाधिक जागा मात्र सत्तेच्या चाव्या मिरगणे- आंधळकरांच्या हाती

mla dilip sopal and rajendra raut cover image

बार्शी : गेली अनेक वर्ष कृषी उत्पन्न बाजार समितीवरील आमदार दिलीप सोपल यांच्या सत्तेला सुरुंग लावण्यात माजी आमदार राजेंद्र राऊत यांना यश आले आहे. एकूण १८ जागांपैकी सर्वाधिक ९ जागा राऊत गटाला मिळाल्या आहेत तर आ सोपल यांच्या पॅनेलला ७ जागांवर विजय मिळवता आला आहे.

बाजार समितीवर प्रशासक म्हणून काम पाहिलेले राजेंद्र मिरगणे आणि शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर यांच्या आघाडीला २ जागांवर समाधान मानावे लागणार आहे. दरम्यान, सर्वाधिक जागा मिळूनही सत्ता स्थापनेसाठी राजेंद्र राऊत गटाला मिरगणे – आंधळकरांची मदत घ्यावी लागणार असल्याचं चित्र आहे.विशेष म्हणजे दिलीप सोपल यांचे पुतणे योगेश सोपल यांना त्यांचे मामा रावसाहेब मनगिरे यांनी पराभूत केले आहे. त्यामुळे सोपल गटाची अवस्था गडही गेला आणि सिंहही गेला अशी झाली आहे.

यंदा प्रथमच तालुक्यातील शेतकऱ्यांना बाजार समिती निवडणुकीत मतदान करण्याचा हक्क मिळाला आहे, १ लाख ६ हजारांच्यावर मतदार असल्याने या निवडणुकीकडे मिनी आमदारकी म्हणून देखील पहिले गेले. आ दिलीप सोपल यांनी आजवर बाजार समितीची सत्ता अबाधित ठेवली होती. मात्र, थेट शेतकऱ्यांतून झालेली निवडणूक सध्यातरी राजेंद्र राऊत यांच्या पथ्यावर पडल्याच दिसत आहे.

दुसरीकडे प्रत्यक्ष निवडणुकीत राजेंद्र मिरगणे यांचा पराभव झाला असला तरी राऊत यांना सत्ता स्थापनेसाठी मिरगणे – आंधळकर आघाडीच्या पाठींब्याची गरज लागणार आहे. दरम्यान, तालुक्यातील शेतकऱ्यांचे हित आणि आगामी राजकीय परिस्थिती पाहून कोणाला पाठिंबा देयचा याचा निर्णय लवकरच घेणार असल्याचे शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर यांनी जाहीर केलं आहे.

विजयी उमेदवार- राऊत गट

पांगरी – गोडसे शालन

उक्कडगाव – रावसाहेब मनगिरे

जामगाव – रणवीर राऊत

घाणेगाव – झुंबर जाधव

श्रीपत पिंपरी – महादेव घोरपडे

सुर्डी – काशिनाथ शेळके

सासुरे – सचिन जगताप

शेळगाव आर – वासुदेव गायकवाड

भालगाव – बुबासाहेब घोडके

सोपल गट

आगळगाव – अभिमन्यू डमरे

उपळाई ठो – वेळे अरुण

माळेगाव – अण्णासाहेब कोंढरे

कारी – राजेंद्रकुमार गायकवाड

उपळे दुमाला – अनिल जाधव

पानगाव – प्रभावती काळे

हमाल तोलार – चंद्रकांत मांजरे

मिरगणे – आंधळकर – आरगडे गट

आडत्या / व्यापारी – साहेबराव देशमुख

कुणाल घोलप

आम्ही माफिया नाही व्यावसायिक आहोत : भाऊसाहेब आंधळकर

हल्लाबोलने झटकणार का बार्शी तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसची मरगळ ?

‘या’ राज्यातील विरोधकांनी राज्यपालांची भेट घेऊन केला सत्ता स्थापनेचा दावा