fbpx

Karnataka Election : काँग्रेसचे सात जेडीएसचे चार आमदार आमच्या संपर्कात : भाजप

टीम महाराष्ट्र देशा- कॉंग्रेसने जेडीएस ला दिलेला पाठींबा मान्य नसल्याचं सांगत कॉंग्रेसवर त्यांचाच पक्षातील नवनिर्वाचित लिंगायत आमदारांनी नाराजी दर्शविल्यामुळे कर्नाटक मध्ये कॉंग्रेसपुढील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. तर दुसऱ्या बाजूला काँग्रेसचे सात जेडीएसचे चार आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा भाजपकडून करण्यात आल्याने कर्नाटक निवडणुकीत आणखी रंगत आली आहे.

कॉंग्रेसने जेडीएसला बिनशर्थ पाठींबा दिल्यानंतर भाजपानंही सत्ता स्थापनेचे प्रयत्न सुरू केले आहेत. काँग्रेस-जेडीएसचे काही आमदार संपर्कात असल्याचा दावाही भाजपाने केला आहे. त्यामुळं सत्ता स्थापनेसाठाच्या हालचालीला वेग आला आहे. भाजपा सगळ्यात मोठा पक्ष असल्यानं सत्ता स्थापनेसाठी पहिलं निमंत्रण मिळावं, यासाठी भाजपानं प्रयत्न सुरू केले आहेत. यामध्ये राज्यपाल वजुभाई वाला यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. भाजपानं राज्यपालांकडे सत्ता स्थापनेसाठी 8 दिवसांची मुदत मागितली आहे.

1 Comment

Click here to post a comment