करमाळ्यात नारायण पाटील-जयवंतराव जगताप यांचे मनोमिलनाचे संकेत?

बागल-शिंदे गटाचे धाबे दणाणले

करमाळा – करमाळा विधानसभा मतदारसंघात राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले असून आमदार नारायण पाटील व माजी आमदार जयवंतराव जगताप यांचे मिनोमिलन होणार असल्याची चर्चा तालुकाभर सुरू असल्यामुळे दोन्ही गटांच्या कार्यकत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. आगामी विधानसभा निवडणूकीत विरोधकांना शह देण्यासाठी आबा व भाऊ एकत्र येतील अशी चर्चा सध्या तालुक्यात सुरू आहे.

करमाळा तालुक्याच्या राजकीय इतिहासात हे दोघे पहिल्यांदाच एकत्र येत आहेत असं नाही यापूर्वी २००४ सालच्या विधानसभा निवडणूकीत आमदार नारायण पाटील यांनी त्यावेळचे आमदार जयवंत जगताप यांना पाठिंबा दिला होता. या पाठिंबा मुळे जयवंत जगताप यांनी तत्कालीन राष्ट्रवादीचे उमेदवार माजी आमदार कै. दिगंबरराव बागल यांचा दारूण पराभव केला होता.

आरोग्यम धनसंपदा आयुर्वेद सर्वासाठी

आरोग्यम धनसंपदा आयुर्वेद सर्वासाठी

त्यानंतर दोन्ही गट एकमेकांना पूरक अशी भूमिका घेत गेल्या दहा वर्षांमध्ये स्थानिक निवडणूकांमध्ये एकत्रित लढले आणि यशही मिळविले.परंतु विधानसभा निवडणूक म्हटले की दोघेही एकमेकांविरोधात लढले.

आगामी विधानसभा निवडणूकीसाठी जि प अध्यक्ष संजय शिंदे आणि राष्ट्रवादीच्या रश्मी बागल यांनी जोरदार मोर्चेबांधणीला सुरूवात केलेली आहे. त्यांना शह देण्यासाठी दोन्ही पाटील-जगताप गटांनी एकत्र येऊन निवडणूक लढवावी अशी दोन्ही गटातील कार्यकर्त्यांची इच्छा आहे.

सध्या तालुकाभर आबा व भाऊ यांचे मनोमिलन होणार अशी चर्चा जरी असली तरी दोघेही एकत्र येणार की नाही हे काही दिवसांत स्पष्ट होईल.आमदार पाटील व माजी आमदार जगताप यांनी एकत्र येऊन विधानसभा लढविली तर विरोधकांना रोखणे सोप्पे होईल आणि निवडणूक जिंकण्यासाठी जास्त कसरत करावी लागणार नाही. राजकीय जाणकारांच्या मते जर हे दोन्ही गट एकत्र आले तर सामना एकतर्फी होण्याची जास्त शक्यता आहे.

Shivjal