fbpx

”जय जिजाऊ, जय शिवराय” च्या जयघोषाने दुमदुमले मातृतिर्थ;

jijau jayanti

सिंदखेडराजा-राजमाता जिजाऊ यांच्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त सिंदखेडराजा या त्यांच्या जन्मगावी जिजाऊ भक्तांची अलोट गर्दी पहायला मिळाली. डोक्यावर भगवा फेटा अन हातात स्वराज्याचे प्रतीक भगवा झेंडा घेऊन दाखल झालेले मावळ्यांनी सगळ्यांचेच लक्ष वेधले. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक याठिकाणी मोठ्या संख्येने दाखल झाले होते.

”जय जिजाऊ जय शिवराय”, ”तुमचं आमचं नात काय जय जिजाऊ जय शिवराय” या घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला. लखोजीराजे जाधव यांच्या राजवाड्यावर असलेल्या जिजामाता यांच्या जन्मस्थानाचे दर्शन घेऊन ही गर्दी जिजाऊ सृष्टी कडे वळली. याठिकाणी जिजाऊ भक्तांसाठी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. जिजाऊ भक्तांसाठी सोयीसाठी मराठा महासंघ व संभाजी ब्रिगेड यांनी या ठिकाणी नियोजनाची चोख व्यवस्था केली होती.